सिंधुदुर्ग
सिंधुदुर्ग पोलीसांन मार्फत रक्षाबंधन निमित्त मा. पोलीस अधीक्षक मोहन दहिकर ,अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती नयोमी साटम, जिल्हा वाहतूक शाखा पोलीस निरीक्षक श्रीमती अरीफा मुल्ला यांच्या मार्गदर्शनाखाली सपोफौ मंगेश सुर्वे पोहेकाँ प्रदिप गोसावी मपोना अनुराधा वागतकर पोकां सत्वशिल जाधव यांनी रक्षाबंधन निमित्त वेंगुर्ले मठ तिठा येथे दुचाकी चालक यांना हेल्मेट वापरा बाबत तसेच वाहना संबंधी असलेली कागदपत्रे अपडेट करणेबाबत तसेच वाहतुकीचे नियम पाळणे बाबत सूचना दिल्या तसेच चारचाकी वाहन चालकांना सीटबेल्ट लावण्याबाबत सुचना दिल्या तसेच सिंधुदुर्ग पोलीस दलामार्फत वाहतूक शाखा सिंधुदुर्ग यांच्या वतीने मपोना अनुराधा वागतकर यांनी चारचाकी व दुचाकी वाहन चालकांना रक्षाबंधन निमित्त राख्या बांधून सर्वांना रक्षाबंधनाच्या शुभेच्छा दिल्या


