Tuesday, September 1, 2026
Google search engine
Homeआपलं कुडाळखड्डे बुजवण्यासाठी वारंवार सांगून सुद्धा चालढकल करणाऱ्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना शिवसेनेच्या...

खड्डे बुजवण्यासाठी वारंवार सांगून सुद्धा चालढकल करणाऱ्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी धरले धारेवर…

कुडाळ | प्रतिनिधी 

खड्डे बुजवण्यासाठी वारंवार सांगून सुद्धा चालढकल करणाऱ्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी धारेवर धरले शहर प्रमुख अभिषेक गावडे यांच्या नेतृत्वाखाली सार्वजनिक विभागाचे उपअभियंता पिसाळ यांना घेराव घालून भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा ते कविलकट्टा भागांमध्ये पडलेल्या खड्ड्यांचा पंचनामा करत अधिकाऱ्यांची पदयात्रा काढली.

कुडाळ शहरातील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगर ते रेल्वे स्थानक रस्ता तसेच कविलकट्टा नाबरवाडी संत राव महाराज कॉलेज रस्ता या ठिकाणी ठीक ठिकाणी खड्डे पडले आहे हे खड्डे लवकरात लवकर भरण्यात यावेत म्हणून कुडाळ शहर शिवसेनेच्या वतीने उप अभियंता पिसाळ यांना निवेदन देण्यात आले होते मात्र याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाकडून कार्यवाही करण्यात आली नाही त्यामुळे आज कुडाळ शहर शिवसेनेच्या वतीने उप अभियंता पिसाळ यांना घेराव घालण्यात आला यावेळी शहर प्रमुख अभिषेक गावडे, नगरसेवक विलास कुडाळकर, राजीव कुडाळकर, गणेश भोगटे, नगरसेविका ज्योती जळवी, उपशहर प्रमुख प्रथमेश केळबाईकर, चेतन पडते, युवा सेना शहरप्रमुख आबा धडाम, प्रथमेश कांबळी, राजाराम गडेकर, राजवीर पाटील आदी उपस्थित होते. यावेळी उपअभियंता पिसाळ यांना धारेवर धरले शहर प्रमुख अभिषेक गावडे यांनी सांगितले की, शहरांमध्ये खड्डे असून सुद्धा तुम्हाला दिसत नाहीत का तुम्ही दिलेला शब्द पाळत नाही हे खड्डे येत्या दोन दिवसात भरा अन्यथा या खड्ड्यांमध्ये वृक्षारोपण केले जाईल आणि तुम्हाला फिरायला सुद्धा दिले जाणार नाही यावेळी उपअभियंता पिसाळ यांनी खड्डे दोन दिवसात भरणार असल्याचे लेखी पत्र दिले तसेच रेल्वे स्थानक कडे जाणाऱ्या मार्गावरील नव्याने बांधलेल्या पुलावर रेलिंग करणार असल्याचे सांगितले यावेळी सर्व कार्यकर्ते आक्रमक झाले होते. 

 

हजेरी पुस्तक व हालचाल नोंदवही नाही 

या विषयाबरोबरच उपअभियंता पिसाळ यांना तुमच्या कर्मचाऱ्यांचे हजेरी पुस्तक दाखवा तसेच हालचाल नोंदवही सुद्धा दाखवा हे सांगितल्यावर पिसाळ यांचे भंबेरी उडाली तब्बल दोन तास या दोन नोंदवहयांसाठी अधिकारी कर्मचारी कपाटे खोलत होते मात्र शेवटपर्यंत त्यांना या नोंदवया मिळाल्या नाही त्यामुळे त्यांनी आपल्याजवळ नोंदवही नाही असे लिहून दिले तसेच बायोमेट्रिक हजेरी मशीन सुद्धा दोन वर्षे बंद असल्याचे सांगितले याबाबतही वरिष्ठ स्तरावर दात मागण्यात येईल असे शहर प्रमुख अभिषेक गावडे यांनी सांगितले 

 

खड्डे दाखवण्याचा कार्यक्रम आणि पदयात्रा 

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून ते थेट कविलकट्टा पर्यंत रस्त्यावर ठिकठिकाणी पडलेले भले मोठे खड्डे अधिकाऱ्यांना दाखविण्यात आले यावेळी उपअभियंता पिसाळ यांच्यासोबत कनिष्ठ अभियंता बामणे, श्री. पवार हे उपस्थित होते तसेच पोलीस अधिकारी कर्मचारी सुद्धा उपस्थित होते हा खड्डे दाखवण्याचा कार्यक्रम पदयात्रेने करण्यात आला तब्बल अडीच किलोमीटर ही पदयात्रा काढण्यात आली तसेच नाबरवाडी येथील रेल्वे पुलाखालील सुद्धा खड्डे दाखवण्यात आले हे लवकरात लवकर खड्डे भरून घेतले जातील असे अधिकाऱ्यांनी सांगितले.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!