Saturday, October 10, 2026
Google search engine
Homeआपलं कुडाळआमदार निलेश राणे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा महिला व बाल रुग्णालय, कुडाळ येथे...

आमदार निलेश राणे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा महिला व बाल रुग्णालय, कुडाळ येथे बंद असलेली सोनोग्राफी सेवा पुन्हा सुरू

कुडाळ | प्रतिनिधी 

 

कुडाळ-मालवण विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार मा. श्री. निलेश राणे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा महिला व बाल रुग्णालय, कुडाळ येथे रुग्णांच्या आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची असलेली सोनोग्राफी सेवा पुन्हा सुरू करण्यात आली आहे.

विशेष म्हणजे, रुग्णालयात सोनोग्राफी मशीन उपलब्ध असूनही मागील काही काळापासून आवश्यक मनुष्यबळाअभावी ही सेवा बंद होती. त्यामुळे महिला रुग्ण, गर्भवती महिला तसेच ग्रामीण भागातून येणाऱ्या रुग्णांना सोनोग्राफीसाठी बाहेरील ठिकाणी जावे लागत होते.

ही बाब लक्षात घेऊन रुग्ण कल्याण समितीवरील आमदार प्रतिनिधी सौ. रश्मी देवेंद्र नाईक यांनी आमदार निलेश राणे यांच्या मार्गदर्शनाखाली संबंधित प्रशासनाकडे सातत्याने पाठपुरावा केला. या पाठपुराव्याला यश आले असून सोनोग्राफी सेवेसाठी डॉ. राजेश उबाळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

आता जिल्हा महिला व बाल रुग्णालय, कुडाळ येथे दर बुधवार व शनिवार दुपारी २.०० ते सायंकाळी ५.०० या वेळेत सोनोग्राफीची सुविधा उपलब्ध राहणार आहे. त्यामुळे परिसरातील महिला व इतर रुग्णांना मोठा दिलासा मिळणार आहे.

यासोबतच रुग्णालयामध्ये महिला रुग्णांसाठी स्त्रीरोग तपासणी व उपचार, प्रसूती, सिझेरियन, विविध आजारांची तपासणी व उपचार तसेच कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया यांसारख्या आवश्यक आरोग्य सुविधा उपलब्ध आहेत.

“रुग्णालयात मशीन उपलब्ध असताना केवळ सेवा बंद राहणे ही रुग्णांच्या दृष्टीने गंभीर बाब होती. ही समस्या दूर करून सोनोग्राफी सेवा पुन्हा सुरू करण्यासाठी आमदार निलेश राणे यांच्या मार्गदर्शनाखाली पाठपुरावा करण्यात आला. आता डॉ. राजेश उबाळे यांच्या नियुक्तीमुळे ही सेवा पुन्हा नागरिकांच्या सेवेत उपलब्ध झाली आहे,” असे आमदार प्रतिनिधी सौ. रश्मी देवेंद्र नाईक यांनी सांगितले.

कुडाळ-मालवण मतदारसंघातील नागरिकांना दर्जेदार आणि वेळेवर आरोग्य सुविधा मिळाव्यात, यासाठी आमदार निलेश राणे यांच्या मार्गदर्शनाखाली रुग्ण कल्याण समितीच्या माध्यमातून यापुढेही सातत्याने प्रयत्न करण्यात येतील असे रश्मी नाईक यांनी सांगितले.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!