सिंधुदुर्ग | प्रतिनिधी
मालवण राजकोट येथील पुतळा कोसळल्यानंतर आपण अस्वस्थ झालो. व्यथित. होऊन तातडीने मी श्री देवी भराडी मातेकडे पोहचलो. यापेक्षा भव्य दिव्य पुतळा उभारण्याचे मला सामर्थ्य दे मला शक्ती दे! एवढी प्रार्थना केली. त्यानंतर लगेचच शंभर वर्षे आयुमान असलेला साठ फूट उंचीचा छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बांधणीचे काम हातीही घेतले. जे विरोधक आपल्यावर याबाबत टीका करत माझेवर खोटे नाटे आरोप होत असतील तर ही भराडी देवी त्यांना शिक्षा देईल असे उद्विग्न उदगार पालकमंत्री तथा सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी काढले!
छत्रपती शिवाजी महाराजांचा आरमार व मराठा साम्राज्याची कारकीर्द ऐतिहासिक असून त्याची आठवण म्हणून या जिल्ह्यात नौसेना दिनाच्या कार्यक्रमात शिवछत्रपतींचा पुतळा उभा करावा ही भावना व ही कल्पना आपण मांडली व ती पूर्णत्वाकडे नेली. दुर्दैवाने दुर्घटना घडली त्याचे दुःख आहेच. पुतळ्याचे हे सर्व काम नौदलाने निविदा काढून केले. कमी दराच्या निवेदनुसार नौदलाकडून त्या ठेकेदारामार्फत काम झाले. हे काम सार्वजनिक बांधकाम विभागाने केले नाही मात्र तरीही आरोप माझ्यावर झाले याचे दुःख आहे. जे लोक अशी कामे करीत नाहीत तीच लोक असे खोटे नाटे आरोप करतात, आपण काम केले, दुर्घटना घडली तरी त्याच ठिकाणी लवकरात लवकर त्याहीपेक्षा भव्य दिव्य पुतळा उभा राहावा म्हणून काम सुरू केले, यासाठी तज्ञ व्यक्तींची मदतही घेतली, नवीन पुतळा उभा करण्यासाठी नव्या अटी शर्ती ठरविण्यात आल्या, नामांकित शिल्पकार प्रकल्प सल्लागार ज्येष्ठ इतिहासकार यांच्या शिफारसी व भारतात विविध ठिकाणी उभारलेल्या पुतळ्यांचा यांचा अभ्यास करून अटी ठरविण्यात आल्या. आता पुतळ्याच्या समुद्रासह २० कोटी खर्च करून संपूर्ण ब्रांझ मध्ये साठ फूट उंचीचा हा पुतळा असेल दुर्घटना घडण्यापूर्वी राजकोट भागाला पाच लाख पर्यटकांनी भेट दिली आहे. या जिल्ह्याचा अपघाताने पालकमंत्री झालो तरी या जिल्ह्यात चांगले काम उभे करावे शिवछत्रपतींचा इतिहास पुन्हा जागृत करावा, एक पर्यटन स्थळ विकसित करावे या भावनेतून आपण हे काम केले. त्यासाठी राज्य सरकारकडून निधी मंजूर करून घेतला व या कामासाठी नौदलाकडे वर्गही केला. हे काम नौदलाने पूर्ण केले. मात्र माझ्यावर आरोप झाले. आपण या आरोपामुळे दुःखी झालो. व्यतीत झालो. खोटे आरोप करणाऱ्यांना भोगावे लागेल असा भावनिक इशारा पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी दिला.
