सिंधुदुर्ग | प्रतिनिधी
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ८ नगरपालिका व नगरपंचायतींसाठी अग्निशमन दलामध्ये बुलेट ही मोटरसायकल दाखल झाली असून या नव्या अग्निशमन बुलेट मोटरसायकलचे स्वागत सर्वत्र होत आहे.
महाराष्ट्र अग्निशमन सेवा संचालयाच्यावतीने सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये अग्निशामक दलामध्ये आठ अग्निशामक बुलेट मोटरसायकल दाखल झाले आहेत या बुलेट मोटरसायकल चा उपयोग ज्या ठिकाणी अग्निशामक दलाचे मोठे वाहन जाऊ शकत नाही त्या ठिकाणी ही मोटरसायकल जाऊ शकते या मोटरसायकल मध्ये पाणी साठवण्यासाठी ३५ लिटरची टाकी देण्यात आली आहे तसेच २० मीटरचा पाईप देण्यात आला आहे या मोटरसायकलला सायरन आहे. या आठही मोटारसायकली प्रत्येक नगरपालिका व नगरपंचायतींना देण्यात येणार आहेत.
