पालकमंत्री राज्य मानांकन कॅरम स्पर्धेमध्ये पुरुष गटात संजय मंडे तर महिला गटात काजल कुमारी प्रथम

0

कुडाळ | प्रतिनिधी

कुडाळ येथे आयोजित केलेल्या पालकमंत्री राज्य मानांकन कॅरम स्पर्धेमध्ये पुरुष गटात संजय मंडे तर महिला गटात काजल कुमारी यांनी प्रथम क्रमांक मिळवला हे दोन्ही विजेते मुंबई येथील आहेत या स्पर्धेचा पारितोषिक वितरण सोहळा येथील महालक्ष्मी हॉल येथे संपन्न झाला.

सिंधुदुर्ग जिल्हा कॅरम असोसिएशन व भारतीय जनता पार्टी क्रीडा आघाडी यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच महाराष्ट्र कॅरम असोसिएशनच्या सहकार्याने कुडाळ येथे पालकमंत्री राज्य मानांकन कॅरम स्पर्धेचे आयोजन केले होते. गेली तीन दिवस ही स्पर्धा सुरू होती. या स्पर्धेचा अंतिम सामने आज (सोमवारी) संपन्न झाले. या स्पर्धेमध्ये पुरुष गटात प्रथम संजय मंडे (मुंबई), द्वितीय झैद अहमद फारुकी (ठाणे), तृतीय सागर वाघमारे (पुणे), महिला गटात प्रथम काजल कुमारी (मुंबई), द्वितीय मधुरा देवळे (ठाणे), तृतीय रिंकी कुमारी (मुंबई) यांनी क्रमांक पटकावले तर या स्पर्धेमध्ये इतर विजेत्यांमध्ये पुरुष गटात प्रकाश गायकवाड (पुणे), योगेश परदेशी (पुणे), महंमद बुब्रान (मुंबई), विकास धारिया (मुंबई), पंकज पवार (मुंबई) महिला गटात केशर निर्गुण सावंत प्राजक्ता नारायणकर (मुंबई), आकांक्षा कदम (रत्नागिरी), दीक्षा चव्हाण (सिंधुदुर्ग), समृद्धी घाडीगावकर यांनी क्रमांक मिळवले.

या सर्वांना पारितोषिक देऊन गौरवण्यात आले यावेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, सरचिटणीस रणजीत देसाई, प्रदेश सदस्य बंड्या सावंत, महाराष्ट्र राज्य कॅरम असोसिएशनचे मानद सचिव अरुण केदार, कुडाळ मंडल अध्यक्ष संजय वेंगुर्लेकर, माजी सरपंच अरविंद शिरसाट, यतीन ठाकूर, सिंधुदुर्ग जिल्हा कॅरम असोसिएशनचे अध्यक्ष सुधीर भणगे, उपाध्यक्ष सुनील धुरी, शुक्राचार्य महाडेश्वर, मुख्य पंच सूर्यकांत पाटील, अमेय पेडणेकर, तसेच नगरसेवक निलेश परब, माजी नगरसेवक सुनील बांदेकर आदी उपस्थित होते.

या बक्षीस वितरणाचे सूत्रसंचालन असोसिएशनचे सचिव योगेश यांनी केले.