आर एस एन ते काॅलेज सर्कल रस्ता चार दिवसात सुस्थितीत करा. नाहीतर आंदोलन
तालुका कार्यालयावर दिली धडक देत
कुडाळ | प्रतिनिधी
महाराष्ट्र नवनिर्माण सेना जिल्हाध्यक्ष धीरज परब व उपजिल्हाध्यक्ष कुणाल किनळेकर यांच्या नेतृत्वात सार्वजनिक बांधकाम विभाग कुडाळ कार्यालय येथे धडक देते अभियंता श्री.पिसाळ यांची भेट घेतली. तसेच कुडाळ कॉलेज सर्कल आर एस एन रस्ता कामाचा कार्यारंभ आदेश होऊन एक वर्ष झाले तरी ठेकेदार काम सुरू करण्यास टाळाटाळ करीत असल्याचे अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिले. यावर मुजोर ठेकेदार मनमानी करत असल्याची स्वतः अधिकाऱ्यांनी देखील मनसेकडे आपली हतबलता व्यक्त केली.यावर महाराष्ट्र नवनिर्माण सेने मार्फत येत्या चार दिवसांत रस्त्यांवरील खड्डे बुजविणे व दसऱ्यानंतर प्रत्यक्ष रस्त्याच्या कामाला सुरुवात न झाल्यास मनसे रस्त्यावर उतरून ठेकेदाराचा माज उतरवेल असा इशारा दिला आहे. यावेळी तालुकाध्यक्ष हेमंत जाधव, उपतालुकाध्यक्ष गजानन राऊळ, उपतालुकाध्यक्ष जगन्नाथ गावडे, विभाग अध्यक्ष अविनाश अणावकर, अक्षय जोशी, अनिकेत ठाकुर, सुरज नेरूरकर, वेदांग कुडतरकर आदी महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते.
