Sunday, July 26, 2026
Google search engine
Homeआपलं कुडाळकुडाळमध्ये रविवारी 'महाराष्ट्रधर्म शिबिर', भाषा-संस्कृती रक्षणावर भर*

कुडाळमध्ये रविवारी ‘महाराष्ट्रधर्म शिबिर’, भाषा-संस्कृती रक्षणावर भर*

डॉ. दीपक पवार व डॉ. प्रकाश परबहे मुख्य वक्ते म्हणून मार्गदर्शन करणार

 

कुडाळ,25जुलै

आधुनिक महाराष्ट्राच्या प्रबोधन युगाचे आद्य प्रवर्तक बाळशास्त्री जांभेकर, बॅ. नाथ पै आणि प्रा. मधु दंडवते यांचा वैचारिक वारसा लाभलेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात महाराष्ट्रधर्म शिबिरा’चे* आयोजन करण्यात आले आहे. हे शिबिर मराठी अभ्यास केंद्राच्या* वतीने रविवार, दि. २६ जुलै* रोजी दुपारी ४ ते ७* या वेळेत कुडाळ येथील *मराठा समाज हॉलमध्ये* पार पडणार आहे.१९६० मध्ये संयुक्त महाराष्ट्राची स्थापना झाली तेव्हा पाहिलेले प्रगत आणि सुसंस्कृत महाराष्ट्राचे स्वप्न आज पूर्ण झालेले दिसत नाही, अशी खंत आयोजकांनी व्यक्त केली. संघर्ष करून मुंबईसह महाराष्ट्र मिळवून देणाऱ्या पूर्वजांचे वारसदार म्हणून आजची स्थिती चिंताजनक आहे. 

सध्या महाराष्ट्र सामाजिक व आर्थिक अडचणींसोबतच भाषिक आणि सांस्कृतिक ओळख गमावण्याच्या उंबरठ्यावर आहे. वाढत्या स्थलांतरामुळे मराठी शाळा बंद पडत असून मराठी भाषा व संस्कृतीचे अस्तित्व धोक्यात आले आहे. त्याचवेळी धार्मिक बहुसंख्याकवादामुळे सामाजिक सलोखाही बिघडत आहे.

या पार्श्वभूमीवर मराठी समाजाला भाषिक, सांस्कृतिक व वैचारिक आत्मभान देणे गरजेचे असून हेच ‘महाराष्ट्रधर्म’* असल्याचे शिबिराचे उद्दिष्ट आहे. 

या शिबिरात डॉ. दीपक पवार व डॉ. प्रकाश परब* हे मुख्य वक्ते म्हणून मार्गदर्शन करणार आहेत. मराठी भाषा, मराठी शाळा आणि महाराष्ट्राबद्दल आस्था असणाऱ्या सर्व नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन मराठी अभ्यास केंद्राचे अध्यक्ष डॉ. दीपक पवारयांनी केले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!