देवगड | प्रतिनिधी
देवगड येथील उमाबाई बर्वे ग्रंथालयाची वार्षिक सर्वसाधारण सभा मावळते अध्यक्ष श्री सागर कर्णिक यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. यावर्षी संचालक मंडळाची मुदत संपत असल्याने सन २०२४ ते २०२९ साठी निवडणूक कार्यक्रम पत्रिकेप्रमाणे निवडणूक कार्यक्रम राबविणेत आली.मात्र ग्रंथालयाच्या ९ जागांसाठी ९ उमेदवारांची बिनविरोध निवड झाली.
त्यानंतर ग्रंथालयाच्या पहिल्या सभेमध्ये डॉ. गुरूदेव परूळेकर यांची अध्यक्षपदासाठी निवड करण्यात आली. उपाध्यक्ष पदासाठीच्या दोन जागांसाठी सौ. उत्तरा जोशी आणि डॉ. गणेश बांदकर यांची निवड करण्यात आली. कार्यवाह/खजिनदार पदासाठी श्री सीताराम पाटील यांची निवड करण्यात आली. तर संचालक सदस्य म्हणून दत्तात्रय जोशी, महेश खोत, मधुरा कुबल, गौरव गोगटे आणि अभिराम देसाई हे राहिलेत. यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून संतोष पाटकर यांनी काम पाहिले.
‘उमाबाई बर्वे ग्रंथालयाला वाचन संस्कृतीची ८४ वर्षांची परंपरा आहे आणि तेव्हापासून ते आतापर्यंत ग्रंथालयाचे देवगडच्या वाचन चळवळीत व सांस्कृतिक उपक्रमात मोठे योगदान आहे. ही परंपरा आम्ही अशीच पुढे चालत ठेवू आणि ग्रंथालयाचे उपक्रम लोकांपर्यंत नेण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करू’ असे अध्यक्ष डॉ. परूळेकर यांनी सांगितले. यावेळी उपाध्यक्ष डॉ. गणेश बांदकर, कार्यवाह श्री सीताराम पाटील, संचालक सदस्य श्री दत्तात्रय जोशी यांनी यांनी आपले मनोगत व्यक्त केले. उपस्थित सर्व मान्यवरांचे उमाबाई बर्वे ग्रंथालयाच्या वतीने आभार व्यक्त करण्यात आले
