कुडाळ शहरात झाले दुर्गा मातेचे आगमन 

0

कुडाळ | प्रतिनिधी 

नवरात्र उत्सवाला गुरुवार ३ ऑक्टोंबर पासून सुरु होणार असून कुडाळ शहरातील गांधी चौक मित्र मंडळाच्या वतीने आज बुधवार २ ऑक्टोंबर रोजी सायंकाळी दुर्गा मातेच्या मूर्तीचे आगमन ढोल ताशाच्या गजरात करण्यात आले. कुडाळ नगरपंचायत मैदानात दुर्गा मातेची प्रतिष्ठापना केली जाणार आहे.

गेली अनेक वर्ष कुडाळ शहरातील गांधी चौक मित्र मंडळाच्या वतीने कुडाळ नगरपंचायत मैदान येथे दुर्गा मातेची प्रतिष्ठापना केली जाते यावर्षी गुरुवार ३ ऑक्टोंबर रोजी ही प्रतिष्ठापना केली जाणार आहे या मंडळाच्या वतीने आज बुधवार २ ऑक्टोंबर रोजी दुर्गा मातेच्या मूर्तीची आगमन मिरवणूक ढोल ताशांच्या गजरात काढण्यात आली. या आगमन मिरवणुकीमध्ये गांधी चौक मित्र मंडळाचे सभासद मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.