कुडाळ नगरपंचायत ॲक्शन मोडमध्ये – थकीत ६ नळकनेक्शन तोडली

0

 

कुडाळ | प्रतिनिधी

नळधारकांनी थकित पाणीपट्टीची रक्कम भरणा न केल्याने कुडाळ नगरपंचायतीने ६ नळधांरकांचा पाणी पुरवठा नळजोडणी तोडून बंद केला आहे.

कुडाळ नं.पं.च्या पाणीपट्टी विभागा कडून १६ लक्ष अधिकची पाणीपट्टी थकविणाऱ्या २९० नळधांरकांना पाणीपट्टी बंद करण्यासाठीच्या नोटीस पाठविण्यात आली होती. पाणीपट्टी न भरल्यास नळकनेक्शन बंद करणार असल्याच्या नोटीस संबंधित थकबाकीदाराना देण्यात आलेल्या होत्या. थकित पाणीपट्टी बंद करण्यासाठी कुडाळ नं. पं. ने पथक तयार केली आहेत. कुडाळ शहरांतील प्रकाश कामत, अनिता ढवळ, रमेश कुणकावळेकर, रामकृष्ण कुडाळकर, गणेश केळबाईकर, राजेश कुडाळकर या वर्षेनुवर्षे थकित पाणीपट्टी असणाऱ्या मिळून ६ नळकनेक्शन बंद करण्यात आली आहेत.

हि कारवाई कुडाळ नं. पं. चे मुख्याधिकारी श्री.अरविंद नातू यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशासकीय अधिकारी गिताजंली नाईक यांच्या नियंत्रणेखाली विभाग प्रमुख संजय हेरेकर , लिपिक सचिन म्हाडदळकर, वसुली कर्मचारी वामन राणे, यशंवत कुडाळकर, चंद्रशेखर आळवे, चंद्रकांत कुंभार, अभिषेक वेतुरेकर यांच्या पथकांने केली.

हि कारवाई अशीच सुरु राहणार असुन पाणीपट्टी थकित असलेल्या नळधांरकांकडे जाऊन ती पाणीपट्टी भरुन घेण्यासाठी वसुली पथक तयार केलेली असुन हे फिरते पथक थकबाकीदारापर्यत पोहोचून त्याच्या कडून पाणीपट्टी वसुल करुन घेत आहेत कुडाळ नं. पं. तर्फे जमा करण्यासाठी विशेष पथक मोहीम हाती घेण्यात आली आहेत.

तसेच उर्वरीत पाणीपट्टी व मालमत्ता थकबाकी असलेल्या थकबाकीदाराची नावे वृत्तपत्र, ठिकठिकाणी चौकात फलक व इतर माध्यमातून जाहीर करण्यात येणार आहेत त्यामुळे वेळेत पाणीपट्टी व मालमत्ताकर भरुन जप्तीची व बंद करण्याची कार्यवाही टाळावी असे आवाहन नं. पं. तर्फे करण्यात येत आहे. तरी सदरची थकीत रक्कम वसुल करण्यास महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम १९६५ मधील कलमांन्वये कायदेशीर कारवाई करण्यात येईल याची नोंद घ्यावी. असे नगरपंचायतीने कळविले आहे.