नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने भडगाव बुद्रुक श्री देव गिरोबा मंदिरात विविध कार्यक्रमांच आयोजन

0

 

कुडाळ | प्रतिनिधी

नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने भडगाव बुद्रुक श्री देव गिरोबा मंदिर येथे विविध कार्यक्रमांच आयोजन केले असून यात सांद्रेवाडी ग्रामस्थांच्या वतीने शुक्रवार दि. ४ ऑक्टोबर रोजी गोरे दशावतार नाट्य मंडळ यांचा पौराणिक नाट्य प्रयोग, शनिवार दि. ५ ऑक्टोबर रोजी निरुखे चिंचेची वाडी यांची यांचा फुगडी कार्यक्रम तर रविवार दि. ६ ऑक्टोबर रोजी घोटगे ढवळवाडी यांचा भजन कार्यक्रम आयोजित केला असून या कार्यक्रमासाठी भडगाव पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन सांद्रेवाडी ग्रामस्थ यांच्यावतीने करण्यात आले आहे.