ॲड. अविनाश माणगावकर यांना मातृशोक

0

देवगड | प्रतिनिधी

मूळ पाटगाव येथील श्रीमती सुलभा मनोहर माणगावकर (९२) यांचे देवगड येथील निवासस्थानी निधन झाले. पार्थिवावर पाटगाव येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. ॲड. अविनाश माणगावकर यांच्या त्या आई होत.

त्यांच्या पश्चात दोन मुलगे, चार मुली, तीन सुना, जावई, नातवडे, पतवंडे असा मोठा परिवार आहे. देवगड येथील ज्येष्ठ विधीज्ज्ञ ॲड. अविनाश माणगावकर यांच्या त्या आई, देवगड नागरी सहकारी पतसंस्थेच्या महाव्यवस्थापिका सौ. विद्या माणगावकर यांच्या त्या सासू होत. तर ॲड. सिद्धेश माणगावकर यांच्या त्या आजी, ॲड. श्रुती माणगावकर यांच्या त्या आजीसासू होत.