विभागीय युवक महोत्सवात बॅ.बाळासाहेब खर्डेकर कॉलेजच्या हर्षदा थोरबोलेचे यश

0

 

कणकवली | प्रतिनिधी 

यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिकचे विभागीय केंद्र कोल्हापूर अंतर्गत २२ वा विभागीय ‘युवक महोत्सव २०२४’ कणकवली कॉलेज येथे संपन्न झाला. या युवक महोत्सवामध्ये विभागीय केंद्रांतर्गत कोल्हापूर, सांगली, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विद्यार्थी सहभागी झाले.
सदर युवक महोत्सवात बॅ. बाळासाहेब खर्डेकर महाविद्यालय वेंगुर्ला (७४०१- ए ) अभ्यास केंद्रावरील प्रथम वर्ष वाणिज्य शाखेची विद्यार्थिनी हर्षदा हरिश्चंद्र थोरबोले हिने भारतीय सुगम संगीत (गायन) या प्रकारात प्रथम क्रमांक प्राप्त केला.

तिच्या या यशाबद्दल शिक्षण प्रसारक मंडळ, कोल्हापूर चे सेक्रेटरी मान. प्रा. जयकुमार देसाई, चेअरमन मान. प्रा.डॉ. मंजिरी अजित मोरे, पेट्रन कौन्सिल मेंबर मान. दौलतराव जयकुमार देसाई तसेच केंद्रप्रमुख व बॅ.बाळासाहेब खर्डेकर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एम.बी.चौगले, संस्था प्रतिनिधी सुरेंद्र चव्हाण यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

यशस्वी विद्यार्थिनीला अभ्यासकेंद्र बॅ. बाळासाहेब खर्डेकर महाविद्यालय, वेंगुर्ला चे केंद्रसंयोजक डॉ.जी.पी. धुरी आणि केंद्रसहायक डॉ.सचिन परुळेकर यांनी मार्गदर्शन केले.