सिंधुदुर्गनगरी नवनगर प्राधिकरण मधील समस्या सोडविण्यासाठी प्रयत्नशील 

0

नवनगर रहिवाशी संघाचे कार्य कौतुकास्पद – जिल्हाधिकारी अनिल पाटील 

 

सिंधुदुर्गनगरी | प्रतिनिधी 

सिंधुदुर्गनगरी प्राधिकरण मधील नवनगर रहिवाशी संघ शैक्षणिक दृष्ट्या मुलांना आणि महिला उद्योजिकांना देत असलेले प्रोत्साहन कौतुकास्पद आहे असेच कार्य कायम सुरु ठेवावे प्रशासनाचे त्याला सहकार्य राहील येथील समस्याही सोडविण्यासाठी प्रयत्नशील राहू असे प्रतिपादन जिल्हाधिकारी अनिल पाटील यांनी नवनगर रहिवाशी संघा मार्फत आयोजित कार्यक्रमात बोलताना केले.

नवरात्रौत्सवा निमित्त नवनगर रहिवाशी संघामार्फत नवनगर मधील उद्योजिका आणि शिक्षण,कला, क्रीडा क्षेत्रात प्रविण्य प्राप्त मुलाचा सत्काराचा कार्यक्रम जिल्हाधिकारी अनिल पाटील यांच्या हस्ते आयोजित करण्यात आला होता यावेळी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणच्या सचिव संपूर्णा कारंडे,भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, तरुण भारत रत्नागिरी सिंधुदुर्ग आवृत्तीचे संपादक शेखर सामंत, माजी पंचायत समिती सदस्या सुप्रिया वालावलकर, पुष्पसेन सावंत न्यानपीठ संस्थेचे विश्वस्त भूपतसेन सावंत, नवनगर रहिवाशी संघाचे अध्यक्ष आदेश नाईक , खजिनदार दीपक जाधव, ग्रामपचायत सदस्या सौ. नाईक, माजी अध्यक्ष अशोक रासम ,चंद्रकांत पाटकर आदी मान्यवर व नवनगर मधील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

प्रभाकर सावंत यांनी बोलताना सिंधुदुर्गनगरी मधील रस्ते दुरुस्तीचा मोठा प्रश्न आहे तो सोडविण्यासाठी प्राधिकरण कडील सर्व रस्ते सार्वजनिक बांधकाम विभागाकडे वर्ग करून घेण्यात आले आहेत त्यामुळे रस्त्यांचा प्रश्न मार्गी लागला आहे लवकरच निधी उपलब्ध करून सर्व रस्त्याची कामे केली जातील,विरंगुळा केंद्रासाठी नियोजन मधून २० लाख रुपये मंजूर करण्यात आले आहेत विधानसभा निवडणुकी नंतर विरंगुळा केंद्राचेही काम होईल ,नगरपंचायत होण्यासाठी सर्वांचच प्रयत्न सुरु आहे एक- दीड वर्षात नगरपंचायत सुद्धा होईल त्याशिवाय येथील गटार बांधणे,भूखंड वर्ग 1 होण्यासाठी प्रयत्न करणे व इतर प्रश्न लवकरात लवकर मार्गी लावण्यासाठी प्रयत्न केले जातील व एक सुंदर शहर निर्माण करू अशी ग्वाही दिली.

शेखर सामंत यांनी बोलताना नवनगर प्राधिकरण मधील पालक आपली मुले विविध क्षेत्रात पुढे आणण्यासाठी प्रयत्न करीत आहेत ते निश्चितच कौतुकास्पद आहेत येथील मुले साता समुद्रपार गेली,काही मुले राष्ट्रीय पातळीवर क्रीडा क्षेत्रात चमकली हे सुद्धा अभिमानास्पद आहे महिला उद्योजिका तयार झाल्या आहेत या सर्वासाठी अधिक पुढे जाण्यासाठी लागणारे सहकार्य करू असे सांगितले 

 संपूर्णा कारंडे यांनी महिला अत्याचाराच्या बाबतीत सजग राहण्याचे आवाहन केले सुप्रिया वालावलकर यांनी बोलताना नवनगर मधील रहिवाशी कायम पाठीशी राहून त्याचे प्रश्न सोडवू असे सांगितले.

यावेळी कार्यक्रमात नवनगर मधील काही महिलांना वेगवेगळे व्यवसाय सुरु करून उद्योजिका बनल्या आहेत व स्वतःच्या पायावर उभ्या आहेत तसेंच काही मुले प्रदेशात शिक्षण घेत शिक्षणात भरारी घेतली आहे तर काही मुले क्रीडा क्षेत्रात राष्ट्रीय स्तरावर पोचली आहेत अशांचा मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला यावेळी प्रसाविक अशोक रासम यांनी केले स्वागत उल्हास पालव, संदीप गावडे, शुभम तवटे, परेश परब, बंड्या नाईक यांनी केले आभार आदेश नाईक यांनी मानले सूत्रसंचालन नागेश नेमळेकर यांनी केले