Sunday, June 21, 2026
Google search engine
Homeआपलं कुडाळहरियाणा विधानसभा निवडणुकीतील यशाबद्दल कुडाळ भारतीय जनता पार्टी च्यावतीने आनंदोत्सव साजरा

हरियाणा विधानसभा निवडणुकीतील यशाबद्दल कुडाळ भारतीय जनता पार्टी च्यावतीने आनंदोत्सव साजरा

कुडाळ | प्रतिनिधी

हरियाणा विधानसभा निवडणुकीतील भारतीय जनता पार्टीच्या अभूतपूर्व यशाबद्दल तसेच जम्मू काश्मीर विधानसभा निवडणुकीत देखील फार मोठ्या प्रमाणात मिळालेल्या यशाबद्दल भारतीय जनता पार्टी कुडाळ तालुक्याच्या वतीने पेढे वाटून आनंदोत्सव साजरा करण्यात आला. नुकत्याच जाहीर झालेल्या हरियाणा विधानसभा निवडणुकीच्या निकालांमध्ये भारतीय जनता पार्टीने स्वबळावर स्पष्ट बहुमत प्राप्त करून तिसऱ्यांदा सरकार स्थापन करण्याच्या दृष्टीने वाटचाल केलेली आहे. याबरोबरच जम्मू काश्मिर मध्ये पार पडलेल्या निवडणुकीत देखील भारतीय जनता पार्टी हा काँग्रेस पक्षाला पाठी काढून दोन क्रमांकाचा पक्ष ठरलेला आहे. हरियाणा व जम्मू-काश्मिर मधील मतदारांनी भारतीय जनता पार्टी व पंतप्रधान नरेंद्र जी मोदी यांच्यावर पुन्हा एकदा विश्वास दर्शवला आहे. या निवडणुकांमध्ये भारतीय जनता पार्टीला मिळालेल्या अभूतपूर्व यशाबद्दल कुडाळ तालुका भारतीय जनता पार्टीच्या वतीने पेढे वाटून आनंदोत्सव साजरा करण्यात आला. यावेळी भारतीय जनता पार्टीचे जिल्हा सरचिटणीस रणजीत देसाई, प्रदेश कार्यकारणी सदस्य बंड्या सावंत, युवा मोर्चा अध्यक्ष रुपेश कानडे, माजी सभापती अभय परब, नगरसेवक निलेश परब, सरपंच रावजी कदम, अमोल कदम, माजी सरपंच सुधीर धुरी, नागेश परब, तन्मय वालावलकर, रोहित आटक, विश्वास पांगुळ, राम बांदेलकर, राहुल वालावलकर व पांडुरंग सडेकर उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!