पोलिसांचा तिसरा डोळा पडला बंद ; अनेक ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे आहेत बंद

0

 

सिंधुदुर्ग | प्रतिनिधी 

सिंधुदुर्ग पोलिसांचा तिसरा डोळा समजला जाणारे सीसीटीव्ही कॅमेरे सध्या मोठ्या प्रमाणावर नादुरुस्त झाले आहेत पोलिसांचा हाच तिसरा डोळा बंद पडला आहे या डोळ्याची दुरुस्ती करण्याची मागणी सिंधुदुर्गातील नागरिकांकडून होत आहे. 

गुन्हे रोखण्यासाठी तसेच अनेक घटनांमध्ये महत्त्वाची भूमिका ही पोलिसांनी उभारलेले सीसीटीव्ही कॅमेरे बजावत होते या सीसीटीव्ही कॅमेऱ्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अनेक गुन्हे सुद्धा उघडकीस आले आहेत. हे सीसीटीव्ही कॅमेरे महामार्गापासून ते प्रत्येक शहरातील मुख्य रस्त्यांवर उभारण्यात आले मात्र गेले काही महिने हे सीसीटीव्ही कॅमेरे बंद अवस्थेत आहेत या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची नादुरुस्ती कशामुळे झाली आणि ते बंद का झाले हे अद्याप उघड झाले नाही मात्र या बंद झालेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यामुळे अनेक घटना पोलिसांना उघड होत नसल्याचेही चित्र दिसत आहे त्यामुळे हे सीसीटीव्ही कॅमेरे लवकरात लवकर उभारण्यात यावे अशी मागणी सिंधुदुर्गातील जनतेकडून होत आहे.