घोटगे गावात गेले पंधरा दिवस विजेचा खेळ खंडोबा

0

कुडाळ | प्रतिनिधी 

घोटगे गावात गेले पंधरा दिवस विजेचा खेळ खंडोबा सुरू आहे मात्र याकडे एकही लोकप्रतिनिधी लक्ष देत नसल्याची खंत स्थानिक व्यापारी संदेश बिले यांनी व्यक्त करून ग्रामस्थांमध्ये कमालीची नाराजी निर्माण झाली आहे.

घोटगे गावामध्ये गेली पंधरा दिवस विजेचा खेळखंडोबा सुरू आहे याबाबत विद्युत वितरण कंपनीच्या संबंधित कार्यालयाला विचार केली असता या कार्यालयाकडून पोखरण कुंदे या ठिकाणी बिघाड असल्याचे सांगितले जाते मात्र त्याच्यावर कोणतीही कारवाई अद्याप पर्यंत केलेली नाही याबाबत लोकप्रतिनिधी सुद्धा उदासीन दिसत आहेत या गावांमध्ये दररोज संध्याकाळच्या वेळेला विद्युत पुरवठा खंडित होत असतो असे पंधरा दिवस सुरू आहे. याबाबत स्थानिक नागरिकांमधून नाराजी व्यक्त केली जात असल्याचे व्यापारी संदेश बिले यांनी सांगितले आहे.