गाव ते मंत्रालय पत्रकारांचा चालता बोलता आधारस्तंभ ; बबन गवस

0

लक्ष्मण विष्णु गवस उर्फ बबन गवस यांचे झाले निधन 

लक्ष्मण विष्णु गवस ऊर्फ बबन गवस यांचे आज शुक्रवार दि. ११ ऑक्टोबर रोजी रात्रौ ८:०५ वा. त्यांच्या राहत्या घरी निधन झाले . त्यांचे अंतिम संस्कार ऊद्या शनिवार दि. १२ ऑक्टोबर रोजी सकाळी ९ वा. डोंगरपाल येथे करण्यात येणार आहेत.

 

————————

कुडाळ | रवी गावडे

————————–

बबन गवस या अक्षरातच मोठी ताकद होती नावात वादळ होतं.. वावटळीसारखं काम करण्याची ताकद होती गाव ते मंत्रालय पत्रकारांचा चालता बोलता आधारस्तंभ होता.. दै.गोमंतक पासून त्यांची माझी ओळख होती.. भेटल्यावर भरभरून बोलणे निखळ बोलणे मनात काही न ठेवणे अशी त्यांची ख्याती होती .. अधिकारी वर्गात मंत्री महोदयात त्यांची वेगळी क्रेझ होती गावातून त्यांनी थेट मंत्रालय गाठले आणि मंत्रालयात अडलेल्या नाडलेल्यांना मदत करून त्यांची बारीक सारीक कामे करू लागले त्यांच्या ओघवत्यावाणीने.. मंत्रालयातील अनेक अधिकारी मंत्री महोदय यांना त्यांनी आपलस केल त्यानंतर तर बबन गवस ही क्रेज निर्माण झाली मुलखातून.. मुंबई गाठणाऱ्या जिल्ह्यातील कोणाही व्यक्तीला कोणाही पत्रकाराला मंत्रालयात जायचं असेल तर तिथे बबन गवसला भेट असं सांगितलं जायचं मग कोणीही बबन गवस कुठे आहे असं शोधत शोधत मंत्रालय गाठायचा मंत्रालयात त्यांची भेट झाल्यावर मग आपण प्रत्येक जण निर्धास्त व्हायचा.. बबन भेटला आता आपला आधार भेटल्यासारखे वाटायचे मग मंत्रालयात कुठेही काम असो बबन हरणाच्या गतीने पळायचे आणि मंत्री असो अधिकारी असो यांची गाठ घालून द्यायचे हा माझ्या गावचा माणूस आहे हा माझा पत्रकार आहे असं आपुलकीने समोरच्या अधिकारी मंत्र्याला सांगून काम करण्यास उद्युक्त करायचे.. अनेक जणांची त्यांनी कामे केली मात्र कधी घमेंडीत राहिले नाही.. काही महिन्यापूर्वी ते आजारी पडले त्यावेळी त्यांना जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष उमेश तोरसकर आणि मी.. बांंदा येथे त्यांच्या निवासस्थानी भेटलो.. खूप गप्पागोष्टी त्यावेळी केल्या जुन्या आठवणींना उजाळा दिला हसत खेळत.. त्यांनी गप्पागोष्टी मारल्या अलीकडे त्यांची प्रकृती बिघडली ते उपचार घेत होते मात्र आज शुक्रवारी रात्री ते आपल्याला सोडून गेल्याची धक्कादायक बातमी आली आणि एका चालत्या बोलत्या हसऱ्या मार्गदर्शकाला आपण मुकल्याची जाणीव झाली आता बबन गवस आपल्याला कधीच भेटणार नाही मात्र बबन गवस यांचे व्यक्तिमत्व.. चिरंतर स्मरणात राहील आणि त्यांच्या आठवणी.. जागत राहतील.. त्यांच्या आत्म्यास शांती लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना