दिवंगत उद्योजक रतन टाटा हिंदुस्थानातील उद्योगधंद्याचे महामेरू यांची आदरांजली सभा
देशावर अतोनात प्रेम करणारा सच्चा देशभक्त दिवंगत रतना टाटा
कुडाळ | प्रतिनिधी
दिवंगत उद्योजक रतन टाटा हिंदुस्थानातील उद्योगधंद्याचे भीष्म पितामह यांचे देहावसन बुधवार दि. ९ ऑक्टोबर रोजी झाले. त्यांना आदरांजली वाहण्यासाठी कुडाळवासियांची आदरांजली सभा रविवार दि. १३ ऑक्टोबर रोजी सकाळी १० वा. श्री देव मारुती मंदिर धर्मशाळा येथे आयोजित केली आहे. तरी उद्योजक रतन टाटा यांच्यावर प्रेम करणारे व त्यांची प्रेरणा घेणाऱ्या सर्वांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन कुडाळवासियांच्यावतीने करण्यात आले आहे.
