Saturday, July 12, 2025
Google search engine
Homeमहाराष्ट्रविविध योजनांच्या माध्यमातून महिलांना स्वतःच्या पायावर उभे राहण्यास हातभार - मुख्यमंत्री एकनाथ...

विविध योजनांच्या माध्यमातून महिलांना स्वतःच्या पायावर उभे राहण्यास हातभार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई | वृत्तसेवा

राज्य शासनामार्फत समाजातील विविध घटकांच्या उन्नतीसाठी योजना राबविल्या जात आहेत. महिलांसाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, लेक लाडकी योजना, मोफत उच्च शिक्षण अशा विविध योजना राबविल्या जात असून महिलांना स्वतःच्या पायावर उभे राहण्यास हातभार लावणार असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

कुर्ला विधानसभा क्षेत्रातील विविध विकास कामांचे भूमिपूजन तसेच लोकार्पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ऑनलाईन करण्यात आले. तत्पूर्वी बंटर भवन कुर्ला येथे शुक्रवारी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. आमदार मंगेश कुडाळकर, माजी खासदार राहुल शेवाळे आदी यावेळी उपस्थित होते. मुख्यमंत्री म्हणाले, महाराष्ट्र उद्योग तसेच परकीय गुंतवणुकीत क्रमांक एकचे राज्य आहे. राज्यात महिलांबरोबरच शेतकरी, युवा, ज्येष्ठ नागरिक आदींसाठी देखील विविध योजना राबविण्यात येत आहेत. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी पुरेशी तरतूद करण्यात आली असून ही योजना बंद होणार नाही, असे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

 

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते यावेळी ऑनलाईन भूमिपूजन तसेच लोकार्पण झालेले प्रकल्प

 

छेडा नगर उड्डाण पुलाचे लोकार्पण. पूर्व द्रुतगती महामार्गावरील बीकेसी कनेक्टर पासून ते यु टर्न करिता प्रस्तावित असलेल्या पुलाचे भूमिपूजन. चुनाभट्टी रेल्वे फाटक वरून प्रस्तावित असलेल्या पुलाचे भूमिपूजन. कुर्ला विधानसभा क्षेत्रातील छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण. चुनाभट्टी प्रवेशद्वार व इतर कामाचे लोकार्पण. कामराज क्रीडांगणाच्या सुशोभीकरणाच्या कामाचे लोकार्पण. 

टिळक नगर येथील हनुमान मंदिर उद्यान नूतनीकरण व सुशोभीकरण कामाचे लोकार्पण. नेहरूनगर येथील छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण मधील नाना नानी पार्क व बालोद्यान याचे नूतनीकरण व सुशोभीकरण कामाचा शुभारंभ. कुर्ला विधानसभेमधील रस्त्यांच्या सिमेंट कॉंक्रिटीकरण कामाचे शुभारंभ. नेहरूनगर टिळक नगर या म्हाडा वसाहती मधील दुसऱ्या टप्प्यातील मला निसारण महिन्यांच्या कामाचे शुभारंभ. कुर्ला पूर्व रेल्वे स्थानकाजवळ मा. बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना याचे लोकार्पण झाले.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!