कुडाळ तालुका बार असोसिएशनच्या वतीने ॲड. संग्राम देसाई यांचा करण्यात आला सत्कार
कुडाळ | प्रतिनिधी
येत्या दोन ते तीन वर्षांमध्ये कोल्हापूर खंडपीठ होईल अशी आशा मला आहे आणि त्या दिशेने आमची वाटचाल सुरू आहे असे प्रतिपादन महाराष्ट्र गोवा बार कौन्सिलचे अध्यक्ष ॲड. संग्राम देसाई यांनी कुडाळ तालुका बार असोसिएशनच्या वतीने आयोजित केलेल्या सत्कार समारंभावेळी सांगून हे जे यश आहे हे तुमच्यामुळे आहे आणि ते मी तुम्हाला अर्पण करतो असे त्यांनी यावेळी सांगितले.
कुडाळ तालुका बार असोसिएशनच्या वतीने महाराष्ट्र गोवा बार कौन्सिलचे अध्यक्ष संग्राम देसाई यांचा सत्कार आयोजित केला होता. हा सत्कार न्यायाधीश राकेश बिले व बार असोसिएशनचे तालुकाध्यक्ष ॲड. राजश्री नाईक यांच्या हस्ते करण्यात आला.
यावेळी उच्च न्यायालयाचे न्यायाधीश राकेश बिले, जिल्हा बार असोसिएशनचे उपाध्यक्ष ॲड. विवेक मांडकुलकर, जिल्हा सचिव ॲड. यतीश खानोलकर, ज्येष्ठ वकील राजीव बिले, ॲड. सौ गौरी देसाई, कुडाळ तालुका बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲड राजश्री नाईक तसेच ॲड नीलांगणी रांगणेकर- सावंत, ॲड. सुधीर भणगे, ॲड. अविनाश परब, ॲड अमित सावंत, ॲड. देवेंद्र सामंत आदी उपस्थित होते.
यावेळी महाराष्ट्र गोवा बार कौन्सिलचे अध्यक्ष संग्राम देसाई यांनी सांगितले की हा सत्कार तुमच्या एकजुटीचा आहे आपल्याला प्रचारादरम्यान काय अनुभव आले आहेत आम्हाला किती कमी लेखले गेले हे सर्वांना माहीत आहे मुळात कोणी कोणाला कमी लेखून चालत नाही कोणता व्यक्ती कोणत्या क्षणी कुठे असेल ते सांगता येणार नाही असे त्यांनी सांगून घटनाकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या गावात न्यायालय नव्हते ते आम्ही सर्वांनी मिळून स्थापन केले. त्यानंतर वकिलांसाठी प्रशिक्षण केंद्र निर्माण व्हावे म्हणून जागा मिळवून दिली आता कोल्हापूर येथे खंडपीठ व्हावी यासाठी प्रयत्न सुरू केले आहे हे प्रयत्न येत्या दोन-तीन वर्षात मार्गी लागतील तसेच कुडाळ, देवगड येथे न्यायालयाची इमारत व्हावी यासाठी केलेले प्रयत्न फलदायी ठरत आहेत. असे त्यांनी सांगितले. तसेच ते म्हणाले, आपल्या जिल्ह्यातील वकिलानी न्यायाधीश या पदापर्यंत जाण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे असे सांगितले.
यावेळी उच्च न्यायालयाचे न्यायाधीश राकेश बिले यांनी सांगितले की माझी वकिली ही कुडाळ पासून सुरु केली आता मी ज्या ठिकाणी काम करतो त्या ठिकाणी संग्राम देसाई हे असतात ते करत असलेले काम मी पाहत आहे खरोखरच वकिलांसाठी त्यांची धडपड मोठी आहे असे सांगितले. तसेच तालुका बार असोसिएशनच्या अध्यक्षा ॲड. राजश्री नाईक यांनी संग्राम देसाई यांच्या वडिलांच्या वकील कारकिर्दी बद्दल सांगून संग्राम देसाई यांच्यामधील संयम हा गुण यांच्या यशाचे गमन आहे असे त्यांनी सांगितले या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ॲड. सुहास सावंत यांनी केले तर प्रास्ताविक ॲड. तृप्ती वालावलकर आणि आभार ॲड. महेश शिंपूगडे यांनी मानले.
