कुडाळ तहसील येथील शासकीय परिसराला सर रतन टाटा संकुल असे नाव द्यावे

0

कुडाळवासियांच्या वतीने उद्योगपती पद्मविभूषण रतन टाटा यांना वाहण्यात आली आदरांजली

कुडाळ | प्रतिनिधी 

ज्येष्ठ उद्योगपती पद्मविभूषण रतन टाटा यांना कुडाळ शहरवासी यांच्या वतीने मारुती मंदिर येथील धर्म शाळेत आदरांजली वाहण्यात आली यावेळी कुडाळ तहसील येथील शासकीय परिसराला सर रतन टाटा संकुल असे नाव देण्यात यावे तसेच भारताचा सर्वोच्च भारतरत्न पुरस्कार त्यांना मरणोत्तर पुरस्कार म्हणून देण्यात यावा असे यावेळी ठरविण्यात आले.

कुडाळ शहरवासी यांच्या वतीने उद्योगपती पद्मविभूषण रतन टाटा यांना आदरांजली वाहण्यात आली यावी उद्योगपती रतन टाटा यांच्या आठवणींना उजाळा देण्यात आला. रतन टाटा आणि देशप्रेम यावरही अनेकांनी मते व्यक्त केली. आणि त्यांना आदरांजली वाहिली. या आदरांजली सभेला व्यापारी संघटनेचे तालुकाध्यक्ष श्रीराम शिरसाट, काँग्रेसचे अभय शिरसाट, शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अमित सामंत, राकेश वर्दम, नरेंद्रकुमार चव्हाण, शेखर नाडकर्णी, मंदार शिरसाट, सागर तेली, रमेश शेरीगर, चंद्रशेखर शिरसाट, राकेश वर्दम, सतीश वर्दम, संदेश पडते, शार्दुल घुर्ये, सूर्या शिरसाट, आबा पडते आधी कुडाळवासीय उपस्थित होते.