मालवण | प्रतिनिधी
मालवण तालुक्यातील प्रसिद्ध धार्मिक स्थळ असलेल्या पेंडूर वेताळ मंदिर येथे भक्त निवासाचे भूमिपूजन भाजपचे कुडाळ मालवण विधानसभा प्रमुख निलेश राणे यांच्या उपस्थितीत झाले.
मालवण तालुक्यातील पेंडुर वेताळ मंदिर येथे भक्तनिवास बांधण्यासाठी जिल्हा वार्षिक योजनेतून २४ लाख ९० हजारांचा निधी खासदार नारायण राणे व पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या माध्यमातून मंजूर करण्यात आला होता. या इमारत बांधकामाचा भूमिपूजन सोहळा संपन्न झाला. यावेळी जिल्हा बँक संचालक बाबा परब, सरपंच नेहा परब, उपसरपंच सुमित सावंत, श्री देव वेताळ देवस्थान ट्रस्ट सचिव अमित कुलकर्णी, मामा माडिये, आप्पा सावंत-पटेल, संतोष साठविलकर, सतीश वाईरकर, राजन माणगावकर, दीपा सावंत, दाजी सावंत, अश्विनी पेडणेकर, शेखर फोंडेकर, साबाजी सावंत, सतीश पाटील, बिपिन परब, शामकांत आवळेगावकर, दिलीप परब, संदेश नाईक, उत्तम गावकर, प्रमोद सावंत, गजानन सावंत, बंड्या माडीये, अमित सावंत, सुरेंद्र जबडे, पिंटू वालावलकर, बाळा गावडे, बाबली गावडे, विपुल माळगावकर, नीरज गुराम, स्वप्नील सावंत, न्हानु पेंडूरकर तसेच इतर ग्रामस्थ पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
