मंदिरांमधील उत्सव बंद होऊ नये असे हिंदू म्हणून मला वाटतं ; भाजपचे नेते निलेश राणे

0

कुडाळ | प्रतिनिधी

कोणत्याही मंदिरांमधील उत्सव बंद होऊ नये असे हिंदू म्हणून मला नेहमी वाटतं कारण आपली परंपरा संस्कृती ही या देवतांची देणगी आहे असे भाजपचे कुडाळ मालवण विधानसभा प्रमुख निलेश राणे यांनी श्री देव कुडाळेश्वर उत्सव मंडळाने आयोजित केलेल्या श्री देव कुडाळेश्वर कीर्तन महोत्सवाच्या निमित्ताने सांगितले. यावेळी त्यांनी श्री देव कुडाळेश्वराचे दर्शन घेतले.

श्री देव कुडाळेश्वर मंदिरामध्ये श्री देव कुडाळेश्वर कीर्तन महोत्सव सुरू आहे या महोत्सवानिमित्त भाजपचे मालवण विधानसभा प्रमुख निलेश राणे यांनी दर्शन घेऊन कीर्तन महोत्सवाच्या तिसऱ्या दिवशी चे उद्घाटन केले यावेळी भाजपचे जिल्हा चिटणीस विनायक राणे, उत्सव मंडळाचे अध्यक्ष किशोर काणेकर, भाजपचे गटनेता विलास कुडाळकर, नगरसेवक अभिषेक गावडे, नगरसेविका चांदणी कांबळी, माजी नगरसेवक राकेश कांदे, सुनील बांदेकर, योगेश राऊळ, राजेश पडते, मंडळाचे महेश कुडाळकर, निलेश कुडाळकर, सुरेश राऊळ, श्रीकृष्ण कुंटे, उदय वेलणकर, चंदन कांबळी, विजय कांबळी आदी उपस्थित होते.

यावेळी भाजपचे कुडाळ मालवण विधानसभा प्रमुख निलेश राणे यांनी सांगितले की एखादा उत्सव परंपरा कायम ठेवणे एखाद्या मंडळाला किती कठीण असते पण या मंडळांनी ही परंपरा ठेवलेली आहे आपण हे उत्सव देवासाठी करतो पण यामध्ये वाद होऊ नये आणि उत्सव बंद पडू नये याची काळजी प्रत्येकाने घेतली पाहिजे मी हिंदू म्हणून सांगतो की हे उत्सव परंपरा आपण टिकवली तर पुढची पिढी हे उत्सव सुरू ठेवेल आणि ती जबाबदारी आपली आहे असे त्यांनी सांगितले.