मोटर सायकल धडकेत पादचारी ठार

0

कुडाळ | प्रतिनिधी 

कुडाळ शहरातील पंचायत समिती कार्यालयासमोर दुचाकी स्वार पादचार्‍याला दिलेल्या धडकेत भैरववाडी येथील पादचारी प्रकाश आनंद मेस्त्री (वय ७५) हे मयत झाले.

पिंगुळी काळेपाणी येथील चिन्मय पाटकर हा आपल्या ताब्यातील पल्सर मोटरसायकल नंबर (एमएच- ०७- एआर -४५३३) ही घेऊन कुडाळ ते पिंगळी अशी घेऊन जात असताना पंचायत समिती कार्यालयासमोर भैरववाडी येथील पादचारी प्रकाश मेस्त्री यांना मोटार सायकलची धडक बसली मध्ये प्रकाश मेस्त्री यांचे निधन झाले. याबाबत कुडाळ पोलीस ठाण्यात उशिरा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.