सिंधुदुर्गनगरी | जि.मा.का.
विधानसभा निवडणुकीची संपूर्ण प्रक्रिया शांततेत, निर्भय व न्याय वातावरणात पार पाडण्याच्या दृष्टीकोनातून राजकीय पक्षांनी, निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांनी किंवा त्यांच्या प्रतिनिधींनी किंवा त्यांच्या हितचिंतकाने निवडणुकीच्या प्रचारासाठी झेंड्याच्या काठ्या उभारणे, कापडी फलक लावणे, भित्तीपत्रक लावणे, घोषणा लिहीणे इत्यादी करीता कोणत्याही व्यक्तीची जागा, इमारत, आवार, भिंती इत्यादीवर संबंधीत मालकाची परवानगी शिवाय व संबंधीत परवाना प्राधिकरणाचे परवानगी शिवाय वापर करण्यास भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ चे कलम १६३ निवडणूक प्रक्रीया पूर्ण होईपर्यंत (दिनांक २५ नोव्हेंबर पर्यंत) निर्बंध लावण्यात आले असल्याचे जिल्हादंडाधिकारी अनिल पाटील यांनी आदेशित केले आहे.
