सिंधुदुर्गनगरी | प्रतिनिधी
सार्वत्रिक विधानसभा निवडणूक खुल्या, मुक्त व निर्भय वातावरणात पार पाडण्यासाठी तसेच संबंधित निर्वाचन क्षेत्रामध्ये कायदा व सुव्यवस्था अबाधीत राहण्यासाठी संदर्भीय पत्रातील मुंबई मद्य निषेध अधिनियम १९४९ चे कलम १४२ अन्वये संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व देशी / विदेशी दारुविक्रीची दुकाने (सीएल-३, एफएल-२, एफएल-बीआर-२, टिडी-१ इत्यादी) अनुज्ञप्ती बंद ठेवण्याचे जिल्हाधिकारी अनिल पाटील यांनी आदेश दिले आहेत.
कोरडे दिवस, बंदचा कालवधी पूर्ण जिल्ह्यात याप्रमाणे- दि. १८ नोव्हेंबर रोजी मतदानाच्या अगोदरचे दिवस, सायं. ५ वाजलेपासून बंद. १९ नाव्हेंबर रोजी मतदानाच्या अगोदरचे दिवस, संपूर्ण दिवस बंद. दि. २० नोव्हेंबर रोजी मतदानाचा दिवस, मतदान पूर्ण होईपर्यंत बंद व दि. २३ नोव्हेंबर रोजी मतमोजणीचा दिवस असणार आहे.
आदेशाची अंमलबजावणी काटेकोरपणे करावयाची असून त्यात कसूर झाल्यास संबंधित अनुज्ञप्तीधारकां विरुध्द कडक कारवाई करण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी अनिल पाटील यांनी कळविले आहे.
