कसाल येथे राज्य उत्पादन शुल्क विभागाची मोठी कारवाई ; २६ लाख रुपयांचा मुद्देमाल केला हस्तगत 

0

सिंधुदुर्गनगरी | प्रतिनिधी

मुंबई गोवा महामार्गावरील कसाल येथे बोलेरो पिक अप गाडी मधून गोवा बनवतीची दारू राज्य उत्पादन शुल्कच्या पथकाने पकडली यामध्ये मुद्देमाल २६ लाख रूपये एवढ्या किमतीचा हस्तगत करण्यात आला आहे. ही कारवाई निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर करण्यात आली आहे. याप्रकरणी वाहन चालक अमजेद शेरखान पठाण (वय- २६, रा. उस्मानाबाद, कळंब, येरमळा) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

विधानसभेची निवडणूक जाहीर झाल्यानंतर राज्य उत्पादन शुल्का च्या विभागाची भरारी पथके विविध ठिकाणी कार्यरत झाली आहे दरम्यान मुंबई गोवा महामार्गावरील कसाल येथे पहाटेच्या सुमारास बोलेरो पिक अप गाडी मधून गोवा बनवतीची दारू वाहतूक केली जात असताना या वाहनाची राज्य उत्पादन शुल्क पथकाने तपासणी केली असता यामध्ये दारूचे ३०० बॉक्स आढळून आले. या दारूची किंमत १८ लाख रूपये एवढी असून वाहण्याची किंमत ८ लाख रूपये एवढी आहे एकूण मुद्देमालाची किंमत २६ लाख रुपये एवढी असून याप्रकरणी उस्मानाबाद येथील वाहन चालकाला ताब्यात घेण्यात आले आहे. ही कारवाई सिंधुदुर्ग अधीक्षक मनोज शेवरे यांच्या मार्गदर्शनानुसार निरीक्षक शरद जाधव, दुय्यम निरीक्षक विशाल सरवटे, गोपाळ राणे, वाहन चालक जगन चव्हाण यांनी केली या गुन्ह्याचा तपास दुय्यम निरीक्षक सरवटे करीत आहेत.