कुडाळमध्ये केंद्रीय राखीव पोलीस दल दाखल ; शहरात केले संचलन

0

कुडाळ | प्रतिनिधी 

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कुडाळ पोलीस ठाण्याच्या वतीने कुडाळ शहरांमध्ये संचलन करण्यात आले यामध्ये कुडाळ पोलिसांसोबत केंद्रीय राखीव पोलीस दल सहभागी झाले होते. 

विधानसभा निवडणुका जाहीर झाल्या आहेत आणि या पार्श्वभूमीवर पोलीस यंत्रणा सज्ज झाली आहे कुडाळ पोलीस ठाण्यामध्ये केंद्रीय राखीव पोलीस दलाचे सत्तर जवान व पाच अधिकारी बंदोबस्तासाठी आले आहेत आज शनिवारी कुडाळ पोलीस ठाण्याचे अधिकारी कर्मचारी व केंद्रीय राखीव पोलीस दलाचे जवान यांनी कुडाळ शहरांमध्ये संचलन केले यावेळी पोलीस उपविभागीय अधिकारी विनोद कांबळे, पोलीस निरीक्षक राजेंद्र मगदूम तसेच केंद्रीय राखीव पोलीस दलाचे अधिकारी उपस्थित होते.