Sunday, June 21, 2026
Google search engine
Homeआपलं कुडाळजिल्ह्यातील विविध कामगार संघटनेंचा शिवसेना बांधकाम कामगार सेनेला सशर्त पाठिंबा

जिल्ह्यातील विविध कामगार संघटनेंचा शिवसेना बांधकाम कामगार सेनेला सशर्त पाठिंबा

शिवसेना बांधकाम कामगार सेनेची जिल्हा कार्यकारिणी जाहीर

कुडाळ | प्रतिनिधी 

महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षाचे मुख्यमंत्री नेते एकनाथजी शिंदे यांच्या आदेशानुसार व बांधकाम कामगार सेनेचे राज्य अध्यश प्रितमशेठ धारिया यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना बांधकाम कामगार सेनेची जिल्हा कार्यकारिणी पक्षाचे जिल्हा संघटक रुपेश पावसकर व कामगार सेनेचे जिल्हाध्यक्ष प्रसाद गावडे यांनी कुडाळ येथील पक्षाच्या संपर्क कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेचे दरम्यान जाहीर केली आहे.ह्यात जिल्हा सचिव पदी निवारा बांधकाम कामगार सेनेचे मंगेश चव्हाण (माणगाव), जिल्हा संघटक पदी रत्नसिंधू बांधकाम कामगार संघटनेचे अशोक बावलेकर (पिंगुळी),संपर्क प्रमुख सतीश सदाशिव कदम(मालवण), समन्वयक एकनाथ सावंत (सावंतवाडी) सह समन्वयक बापू वरक (मालवण) यांची नेमणूक करण्यात आली आहे. स्थानिक कामगारांना भेडसावणाऱ्या विविध समस्या, कामगार क्षेत्रात फोपावलेल्या परप्रांतीय कामगारांच्या अतिक्रमणाला आळा घालणे, कामगारांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने न्याय्य मागण्या व कामगार कायद्याचे संरक्षण मिळवून देणे, शासनाकडील कल्याणकारी प्रलंबित योजना, घरेलू असंघटित कामगारांचे प्रश्न आदी घटकांवर सेनेच्या माध्यमातून काम केले जाणार असल्याचे यावेळी जाहीर करण्यात आले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!