खासदार नारायण राणे यांनी ज्या शिवसेना पक्षातून आणि चिन्हावर निवडणूक लढवली होती त्यात चिन्हावर निवडणूक लढवण्याची संधी
उद्या बुधवार २३ ऑक्टोबर रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत होणार प्रवेश
कुडाळ | प्रतिनिधी
माजी मुख्यमंत्री व खासदार नारायण राणे यांची ज्या पक्षातून आणि ज्या चिन्हावर सुरुवात झाली त्या धनुष्यबाणावर निवडणूक लढण्याची मला संधी मिळत आहे हे मी माझे भाग्य समजतो असे माजी खासदार निलेश राणे यांनी सांगून मी उद्या बुधवार २३ ऑक्टोंबर रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेमध्ये प्रवेश करणार असल्याचे पत्रकार परिषदेत सांगितले
माजी खासदार निलेश राणे यांनी कुडाळ येथे पत्रकार परिषद घेतली यावेळी माजी नगराध्यक्ष विनायक राणे, माजी नगरसेवक राकेश कांदे यांच्या समवेत उपस्थित होते. यावेळी पत्रकार परिषदेमध्ये माजी खासदार निलेश राणे यांनी सांगितले की, २०१९ मध्ये माजी मुख्यमंत्री नारायण राणे आमदार नितेश आणि यांच्या समवेत मी भाजपमध्ये प्रवेश केला भाजपमध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्यासह अनेक नेत्यांनी मला सहकार्य केले मला त्यांनी समजून घेतले आणि साथही दिली युती धर्माच्या शिष्टाचारानुसार नेत्यांनी ठरवलेल्या प्रमाणे निर्णय होत असतात आणि त्या निर्णयामध्ये महायुती मधून निवडणूक लढवण्याची मला संधी मिळत आहे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व त्यांच्या सर्व मंत्री महोदयांच्या उपस्थितीत उद्या बुधवार २३ ऑक्टोंबर रोजी सायं. ४ वा. कुडाळ हायस्कूल मैदानावर माझा शिवसेनेमध्ये प्रवेश होणार आहे भाजपच्या सर्व नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी आतापर्यंत मला सहकार्य केले आहे तसेच यापुढे एक करतील अशी आशा आहे.
१९ वर्षांनी धनुष्यबाण चिन्हावर लढवणार निवडणूक
खासदार नारायण राणे यांनी शिवसेना सोडून तब्बल १९ वर्ष झाली आहे याबाबत माजी खासदार निलेश राणे यांना विचारले असता त्यांनी सांगितले की माजी मुख्यमंत्री व खासदार नारायण राणे यांची शिवसेना पक्षातून सुरुवात झाली त्यांनी या निवडणुका लढल्या त्या धनुष्यबाण चिन्हावर होत्या ज्या पक्षातून त्यांची सुरुवात झाली त्याच पक्षातून आणि धनुष्यबाण चिन्हावर निवडणूक लढण्याची संधी मला मिळत आहे हे माझे भाग्य आहे आणि ही संधी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे.
महाराष्ट्रातील पहिल्या ५ मतदारसंघांमध्ये हा मतदारसंघ असला पाहिजे
मी ही निवडणूक काही मिळवण्यासाठी लढत नाही तर गेली १० वर्ष या मतदारसंघांमध्ये कोणत्याही प्रकारचा विकास झालेला नाही कोणत्याही प्रकारच्या व्हिजन ठेवून काम केलेले नाही हा मतदारसंघ महाराष्ट्रातील ५ मतदारसंघांमध्ये असला पाहिजे अशा प्रकारचा विकास या मतदारसंघात झाला पाहिजे या व्हिजनने काम करायचं आहे आणि याला जनता साथ देणार हा विश्वास आहे ही निवडणूक आम्ही जिंकू असा विश्वास त्यांनी या पत्रकार परिषदेमध्ये व्यक्त केला.
