क्रेशर क्वारीचे शाखाप्रमुख असलेल्या बाळा नाईक यांना कळसुलीत जनाधार नाही

0

कणकवली | प्रतिनिधी

ज्यांना आपल्या पक्षाचे कार्यकर्ते सांभाळता येत नाहीत, कळसुली ग्रामपंचायत निवडणुकीत जे आपल्या पक्षाचे उमेदवार निवडून आणु शकले नाहीत,अशा जनाधार नसलेल्या आणि चिरीमिरीवरती आपले राजकारण करत असलेल्या, कुवत नसलेल्या क्रेशर क्वारीचे शाखाप्रमुख म्हणून ओळख असलेल्या बाळा नाईक यांनी सरपंच सचिन पारधिये यांच्यावर आरोप करु नयेत .अशी टिका भाजप चे कळसुली बुथ अध्यक्ष स्वप्नील गोसावी यांनी केली .

बाळा नाईक यांनी सरपंच सचिन पारधिये यांच्यावरती प्रसिध्दी पत्रकातून टिका केली होती.त्या टिकेला‌ स्वप्नील गोसावी यांनी उत्तर दिले. स्वप्नील गोसावी म्हणाले की, आमदार नितेश राणे यांच्या उपस्थितीत प्रवेश केलेले कळसुली सुद्रीक वाडीतील ते सर्व कार्यकर्ते उबाठाचेच होते.आणि त्यांनी आमदार नितेश राणे यांच्या नेतृत्वावर प्रभावित होऊन प्रवेश केला आहे.त्यामुळे क्रेशर क्वारीचे शाखाप्रमुख बाळा नाईक हे आमदार नाईक यांना खुश करण्यासाठी राजकीय स्टेटमेंट करीत आहेत.अशी टीका स्वप्नील गोसावी यांनी कळसुली चे उबाठा शाखा प्रमुख बाळा नाईक यांच्यावरती केली.

आमदार नितेश राणे यांच्या उपस्थितीत प्रवेश केलेले ते सर्व कार्यकर्ते कळसुली येथील उबाठा गटाचे होते.सरपंच सचिन पारधिये यांच्या कार्यप्रणालीवर विश्वास ठेवून आमदार नितेश राणे यांच्या नेतृत्वावर प्रभावित होऊन पक्ष प्रवेश केला आहे.आमदार नितेश राणेंच्या माध्यमातून कळसुली गावचा विकास झाला आहे आणि कोट्यावधीच्या निधीतून विकास कामे होत आहेत.म्हणूनच उबाठाचे कार्यकर्ते भारतीय जनता पार्टी मध्ये प्रवेश करत आहेत.त्यामुळे बाळा नाईक वैफल्यग्रस्त झालेले असुन त्यांना लाजिरवाणी खोटी स्टेटमेंट करावी लागत आहेत.आज प्रवेश केलेले हे उबाठाचे कार्यकर्ते ग्रामपंचायत निवडणुकीत तुमच्या सोबत होते.पण तुमच्या वरती त्यांचा विश्वास नसल्याने आणि तुम्ही विकास कामे करु शकत नाहीत हे त्यांना समजले आहे.म्हणूनच आज ते आमच्या सोबत आले आहेत.त्यामुळे बाळा नाईक यांच्या वरती आत्मपरीक्षण आणि आत्मचिंतन करण्याची वेळ आली आहे.यापुढील काळात बाळा नाईक हे उर्वरित कार्यकर्त्यांना सोबत घेऊन उबाठा सेनेला जय महाराष्ट्र करुन भाजपचे कमळ हाती घेतील. अशी उपरोधिक टीका ही स्वप्नील गोसावी यांनी केली.