पहिल्या दिवशी कोणीही अर्ज भरला नाही नऊ अर्ज विक्री.
कुडाळ | प्रतिनिधी
विधानसभा निवडणुकीच्या अर्ज भरण्यास सुरुवात झाली असून कुडाळ मालवण विधानसभा मतदारसंघात पहिल्या दिवशी कोणीही अर्ज भरला नाही. मात्र नऊ अर्जांची विक्री झाली असून यामध्ये दोन अर्ज विद्यमान आमदार वैभव नाईक यांनी घेतले आहेत.
विधानसभा निवडणुकीसाठी दि. २२ नोव्हेंबर पासून ऑक्टोबर पासून उमेदवारी अर्ज भरण्यास प्रारंभ झाला आहे. कुडाळ मालवण मतदार विधानसभा मतदारसंघाचा विचार करता पहिल्या दिवशी कोणीही उमेदवारी अर्ज भरला नाही पहिल्या दिवशी या विधानसभा मतदार संघातून निवडणुकीस उभे इच्छुक असलेल्या उमेदवारांपैकी नऊ जणांनी उमेदवारी अर्ज घेतले आहेत. यामध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गटाचे उमेदवार वैभव नाईक यांनी दोन अर्ज घेतले आहेत. तर इतर काही अपक्ष उमेदवारांनी अर्ज घेतले आहेत अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी यांनी दिली.
