सावंतवाडी | प्रतिनिधी
माजी खासदार निलेश राणे यांचे खंदे समर्थक सावंतवाडीची माजी नगराध्यक्ष संजू परब यांची शिवसेना जिल्हा संघटक पदी आज शुक्रवारी निवड करण्यात आली . शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी आज त्यांना अधिकृतपणे पत्र देऊन संघटक पदाची जबाबदारी दिली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत माजी खासदार निलेश राणे यांनी शिवसेनेत प्रवेश केला त्यावेळीच आपण शिवसेना पक्षात सहभागी झालो असल्याचे परब यांनी सांगितले निलेश राणे यांचे कट्टर समर्थक म्हणून त्यांची जिल्ह्यात ओळख आहे त्यांच्या समवेत युवा कार्यकर्त्यांची मोठी फळी आहे शिवसेना संघटक पदी जबाबदारी देण्यात आल्यानंतर शिवसेनेत नवचैतन्य निर्माण झाले आहे
