दत्ता सामंत राणे कुटुंबीयांचे ; चर्चांना मिळाला पूर्णविराम

0

सिंधुदुर्ग | प्रतिनिधी 

राणे समर्थक असलेले दत्ता सामंत यांच्या बद्दल गेली अनेक दिवस चर्चा सुरू होत्या. दत्ता सामंत राणे कुटुंबियांपासून फारकत घेतील अशीही चर्चा होती. मात्र दत्ता सामंत हे राणे कुटुंबियातील एक घटक असल्याचे पुन्हा एकदा दिसून आले आहे. खासदार नारायण राणे व त्यांच्या कुटुंबीयांसोबत दत्ता सामंत यांचे छायाचित्र प्रसिद्ध झाल्यावर अनेक चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे.

खासदार नारायण राणे यांच्यासोबत अनेक वर्ष टिकून असलेले आणि त्यांच्या सोबत प्रत्येक क्षणात सहभागी असणारे दत्ता सामंत यांच्या बद्दल अनेक दिवस विविध चर्चा होत होत्या दत्ता सामंत यांना उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाकडून विधान परिषद दिली जाईल त्यासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील उद्धव बाळासाहेब ठाकरे सेनेचे पदाधिकारी त्यांच्याशी भेटले अशा चर्चा सुरू होत्या तसेच राणे कुटुंबीयांशी ते फारकत घेतील अशी चर्चा होती याबाबत दत्ता सामंत यांनी कोणत्याही प्रकारे प्रसिद्धी माध्यमांना आपली भूमिका सांगितली नाही त्यामुळे अनेक चर्चांना अधिक उधाण आले होते. 

माजी खासदार निलेश राणे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेमध्ये प्रवेश केला त्यावेळी दत्ता सामंत हे उपस्थित राहिले नाहीत. त्याबाबतही चर्चा झाली मात्र दत्ता सामंत यांनी अनेक कार्यक्रमांमध्ये खासदार नारायण राणे आणि त्यांच्या कुटुंबीयांची कधीही दूर होणार नाही असे ते सांगत असायचे मात्र या चर्चामुळे नेमकं काय चाललंय हे समजत नव्हते आणि याचा फायदा उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे पदाधिकारी कार्यकर्ते घेत होते. 

दरम्यान दत्ता सामंत यांनी खासदार नारायण राणे, सौ. नीलम राणे, माजी खासदार निलेश राणे, आमदार नितेश राणे यांची कणकवली येथे भेट घेतली. आणि आपली कोणतीही नाराजी नसल्याचे सांगितले. विधानसभा निवडणुकीमध्ये निलेश राणे यांच्या खांद्याला खांदा लावून काम करणार असा शब्द त्यांनी दिला अशी चर्चा आहे. दत्ता सामंत यांच्या या भेटीमुळे चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे.