Saturday, May 9, 2026
Google search engine
Homeआपलं कुडाळसिंधुदुर्ग (चिपी)  ते मुंबई  अलायन्स एअरची उड्डाणे नियमितपणे सुरू ठेवण्यात यावी :-...

सिंधुदुर्ग (चिपी)  ते मुंबई  अलायन्स एअरची उड्डाणे नियमितपणे सुरू ठेवण्यात यावी :- माजी खासदार विनायक राऊत यांची मागणी

कुडाळ | प्रतिनिधी

आरसीएस अंतर्गत सिंधुदुर्ग (चिपी)  ते मुंबई  अलायन्स एअरची उड्डाणे नियमितपणे सुरू ठेवण्यात यावी अशी मागणी शिवसेना ठाकरे गटाचे सचिव तथा माजी खासदार विनायक राऊत यांनी केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री राममोहन नायडु किजरापू यांना निवेदनाद्वारे केली आहे.

माजी खासदार विनायक राऊत यांनी दिलेल्या निवेदनात असे नमूद केले आहे की,महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग जिल्हा हे एक प्रसिद्ध पर्यटन स्थळ आहे,जिथे देश-विदेशातील पर्यटक मोठ्या संख्येने भेट देतात.याच जिल्हात दोन वर्षांपूर्वी चिपी विमानतळ सुरू झाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ड्रीम प्रोजेक्ट मधील उड्डाण योजनेअंतर्गत सिंधुदुर्ग चिपी विमानतळाचा समावेश करण्यात आला, त्यामुळे सिंधुदुर्गातील सर्वसामान्य लोकांना परवडणाऱ्या दरात विमान प्रवास सोपा झाला होता. तत्कालीन नागरी विमान वाहतूक मंत्री सुरेश प्रभु यांच्या कार्यकाळात तत्कालीन  मुख्यमंत्री  उद्धव ठाकरे आणि तत्कालीन नागरी विमान वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांच्या सहकार्याने 9 ऑक्टोबर 2021 पासून चिपी विमानतळ, सिंधुदुर्ग आणि मुंबई दरम्यान अलायन्स एअरची उड्डाणे सुरू झाली.याचा पर्यटकांना तसेच स्थानिक आणि व्यावसायिक दोघांनाही मोठा फायदा झाला. मात्र विमान कंपनीने अलीकडेच जाहीर केले आहे की ते 26 ऑक्टोबर 2024 पासून आपली उड्डाणे बंद करणार आहोत. किंबहुना गेल्या तीन वर्षात पर्यटनाला चालना देणाऱ्या आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या आर्थिक विकासाला हातभार लावणाऱ्या या हवाई सेवेला देश-विदेशातील नियमित स्थानिक प्रवासी आणि पर्यटकांनी भरभरून प्रतिसाद दिला आहे.त्यामुळे चिपी विमानतळ, सिंधुदुर्ग आणि मुंबई दरम्यानची उड्डाणे बंद करण्याचा अलायन्स एअरचा निर्णय अत्यंत दुर्दैवी आहे. सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी या दोन्ही कोकण जिल्ह्यांतील पर्यटन व्यवसायावर याचा विपरीत परिणाम आणि दूरगामी परिणाम होणार आहे. त्यामुळे या विषयाकडे आपण वैयक्तिकरित्या लक्ष द्या आणि सार्वजनिक हितासाठी अलायन्स एअरला चिपी विमानतळ, सिंधुदुर्ग आणि मुंबई दरम्यान नियमितपणे उड्डाणे सुरू ठेवण्याचे आदेश द्यावेत अशी मागणी केली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!