सिंधुदुर्ग | प्रतिनिधी
कट्टर राणे समर्थक असलेले दत्ता सामंत हे शिंदे गट शिवसेनेमध्ये लवकरच प्रवेश करणार असून त्यांच्या खांद्यावर जिल्हाप्रमुख पदाची जबाबदारी देण्यात येणार असल्याचे खात्रीदायक वृत्त आहे येत्या दोन दिवसात अधिकृत घोषणा शिवसेना पक्षाकडून केली जाणार असल्याचे समजते.
मालवण तसेच कुडाळातील अनेक ग्रामीण भागामध्ये दत्ता सामंत यांची पकड आहे ग्रामीण भागातील मतदार त्यांना ओळखतो त्यांच्याकडे असलेले दातृत्व, नेतृत्व आणि वक्तृत्व यामुळे अनेक जण त्यांच्याशी जोडले गेलेले आहेत. तसेच दशावतार, भजनी कलाकार सुद्धा यांच्यासोबत नेहमी असतात. कार्यकर्त्यांच्या पाठीशी कायम राहणाऱ्या दत्ता सामंत यांच्यावर शिवसेना जिल्हाप्रमुख पदाची जबाबदारी देणार असल्याचे समजते. येत्या दोन दिवसात ते माजी खासदार निलेश राणे यांनी प्रवेश केलेल्या शिंदे गट शिवसेनेमध्ये ते प्रवेश करणार आहेत आणि त्यानंतर त्यांच्यावर जिल्हाप्रमुख पदाची जबाबदारी देण्यात येणार असल्याचे खात्रीदायक वृत्त आहे.
