माणगाव | प्रतिनिधी
माणगाव येथील श्री दत्त मंदिर व श्री देवी यक्षिणी देवीचे दर्शन महायुतीचे उमेदवार निलेश राणे यांनी घेतले आणि प्रचाराचा शुभारंभ केला. यावेळी महायुतीचे उमेदवार निलेश राणे हे लाखोंच्या मताधिक्याने निवडून यावेत असे साकडे घालण्यात आले यावेळी मोठ्या प्रमाणावर महायुतीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
महायुतीचे उमेदवार निलेश राणे यांच्या प्रचाराचा शुभारंभ माणगाव येथील दत्त मंदिर व श्री देवी लक्ष्मी चे दर्शन घेऊन श्रीफळ ठेवून करण्यात आला यावेळी दत्त मंदिर विश्वस्त मंडळ अध्यक्ष सुभाष भिसे, भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष दत्ता सामंत उपनेते संजय आंग्रे भाजपचे सरचिटणीस रणजीत देसाई, अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशचे काका कुडाळकर, प्रदेश सदस्य संध्या तेरसे, शिवसेनेच्या महिला अध्यक्षा वर्षा कुडाळकर, दीपलक्ष्मी पडते, जिल्हा बँक संचालक प्रकाश मोर्ये, भाजपचे जेष्ठ पदाधिकारी दादा बेळणेकर, भाजपचे निमंत्रक राजू राऊळ, प्रशांत राणे प्रदेश सदस्य बंड्या सावंत, संघटक रुपेश पावसकर, कुडाळ मंडल अध्यक्ष संजय वेंगुर्लेकर, ओरोस मंडल अध्यक्ष दादा साईल, राजन भगत, रुपेश कानडे शिवसेना तालुकाप्रमुख बंटी तुळसकर, अरविंद करलकर, सिद्धेश शिरसाट, ॲड विवेक मांडकुलकर, खरेदी-विक्री संघ अध्यक्ष दीपक नारकर, भाजप चिटणीस विनायक राणे, मोहन सावंत, आनंद शिरवलकर, कुडाळ नगरपंचायत भाजपा गटनेता विलास कुडाळकर माजी नगरसेवक राकेश कांदे माजी सभापती अभय परब, नागेश परब, सचिन धुरी, अविनाश राणे, आर. के. सावंत, भाई बेळणेकर, पांडू सावंत, दत्ता कोरगावकर, जोसेफ फर्नांडिस, केशव भरतू, सगुण धुरी, दीपक कानेकर, सचिन परब, सुरज नाईक, संजय नाईक, दिनेश वारंग आदी उपस्थित होते.
या प्रचार शुभारंभ कार्यक्रमाला मोठ्या प्रमाणावर महायुतीचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते या सर्वांच्या उपस्थितीमध्ये श्री दत्त मंदिर येथे श्रीफळ ठेवून प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला त्यानंतर श्री देवी यक्षिणीचे दर्शन घेऊन साकडे घालण्यात आले.
