डोंबिवली | वृत्तसेवा
महाराष्ट्राचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी डोंबिविली पश्चिम येथे आपला उमेदवारी अर्ज भरला, यावेळी अनेक भाजप चे कार्यकर्त्यांनी भली मोठी रॅली काढली. ढोल पथक , लेझीम पथक, अशी वेगवेगळी वाद्य वृंद तसेच अनेक महिला पुरुष असे किमान पन्नास हजार लोक रस्त्यावरून चालत या रॅली मध्ये सहभागी झाले होते. यावेळी अनेक डोंबिविली करांनी आप आपल्या घरातून पुष्प वृष्टी केली.
विशेष म्हणजे भाजप रत्नागिरी तालुका अध्यक्ष दक्षिण दादा दळी, भाजप उत्तर तालुका अध्यक्ष विवेक सुर्वे, तालुका सरचिटणीस सुशांत पाटकर, उमेश देसाई, उपाध्यक्ष राजू पाथरे, जिल्हा उपाध्यक्ष बावाशेठ नाचणकर , महेश पाटील,वैभव पोटकर आदी भाजपा कार्यकर्ते चव्हाण साहेबाना शुभेच्छा देण्यासाठी डोंबिविलीला गेले होते.
