तो हल्लेखोर नसून कणकवली येथे चिरेखानीमध्ये काम करणारा कामगार
सावंतवाडी पोलिसांनी केला तपास
सावंतवाडी | प्रतिनिधी
भाजपचे बंडखोर उमेदवार विशाल परब यांच्या गाडीवर झालेल्या कथित हल्ल्याचा आता पोलखोल झाला आहे मुळात हा हल्ला नसून कणकवली कडे जाण्यासाठी वाहन थांबवण्याचा प्रयत्न करणाऱ्या चिरेखान कामगाराला हल्लेखोर म्हणून पोलिसांसमोर आणून त्याला दहशतवादाचा दाखवलेला रंग आता पोलीस तपासात उडाला आहे. त्यामुळे ही सहानुभूतीसाठी स्टंटबाजी होती की काय अशी चर्चा जनतेमध्ये सुरू झाली आहे.
सावंतवाडी मतदार संघामध्ये भाजपचे बंडखोर उमेदवार विशाल परब हे काल रात्री सावंतवाडीच्या दिशेने परतत असताना निरवडे येथे एका परप्रांतीय व्यक्तीने गाडीवर हल्ला करण्याचा प्रयत्न केल्याची तक्रार दिल्यानंतर या घटनेचा तपास सावंतवाडी पोलिसांनी केला यामध्ये असे निष्पन्न झाले की कणकवली येथे असलेल्या गावातील चिरेखणीमध्ये झारखंड रांची येथील संजय गोप व त्याच्यासोबत असलेला विनोद गोप हे आपल्या झारखंड येथील गावातून कणकवली येथे परतत असताना संजय गोप हा सावंतवाडी रेल्वे स्थानक येथे लघु शंकेसाठी उतरला. त्यानंतर रेल्वे कणकवलीच्या दिशेने गेली ही रेल्वे त्याला चुकली मात्र त्याचा नातेवाईक विनोद गोप हा कणकवली येथे गेला. सावंतवाडी वरून कणकवलीला जाण्यासाठी नंतर रेल्वे नसल्याचे समजल्यावर त्याने कोणत्यातरी गाडीला हात दाखवून कणकवली येथे जाण्याचे ठरविले त्यामुळे रेल्वे स्थानकापासून २०० मीटरच्या अंतरावर निरवडे गावाच्या हद्दीमध्ये असलेल्या सिल्वर बिल्डिंगच्या समोर तो वाहनांना हात दाखवत होता त्यावेळी त्याच्या हातामध्ये दांडा होता त्याच दरम्याने भाजपचे बंडखोर उमेदवार विशाल परब हे त्या रस्त्याने जात असताना त्यांनी गाडी थांबवण्याचा प्रयत्न केला गाडी थांबल्यावर त्या गाडीतून काही माणसे उतरल्यावर त्याने घाबरून पळ काढला त्याला पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले दरम्यान त्याचा नातेवाईक विनोद गोप हा सुद्धा सावंतवाडी येथे त्याच्या शोधात आल्यावर संजय गोप याला पोलिस आणि पकडल्याचे त्याला समजले संजय गोप याच्याकडून माहिती घेतली असता त्यांनी घडलेली घटना सांगितली त्यामुळे भाजपचे बंडखोर उमेदवार विशाल परब यांनी रचलेली कहाणी पुस्तक जमा झाली. हा एक प्रकारचा स्टंट होता सहानुभूतीसाठी हे उघड झाले. हा व्यक्ती चिरेखानीमध्ये काम करणारा असल्याचे निष्पन्न झाले आहे. या घटनेचा तपास पोलीस निरीक्षक अमोल चव्हाण यांनी करून ही सत्यता उघडकीस आणली आहे.
