मांडकुली गावामध्ये उबाठा शिवसेनेला भगदाड

0

महायुतीचे उमेदवार निलेश राणे यांच्या उपस्थितीत उबाठा शिवसेनेचे माजी उपसरपंच व शाखाप्रमुख यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी केला प्रवेश

 

कुडाळ | प्रतिनिधी

मांडकुली येथील उबाठा शिवसेनेचे माजी उपसरपंच दिलीप निचम व शाखाप्रमुख निलेश खानोलकर यांच्यासह असंख्य कार्यकर्त्यांनी महायुतीचे उमेदवार निलेश राणे यांच्या उपस्थितीत मांडकुली येथे शिवसेनेत प्रवेश केला. त्यामुळे मांडकुली गावामध्ये उबाठा शिवसेनेला भगदाड पडले आहे.

गेली अनेक वर्ष या गावातील ग्रामस्थ उबाठा शिवसेनेसोबत होते या ग्रामस्थांना आश्वासनापलीकडे काही मिळत नव्हते या गावाचा विकास थांबला होता गावाचा विकास व्हावा या हेतूने उबाठा शिवसेनेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी महायुतीचे उमेदवार निलेश राणे यांच्या उपस्थितीत प्रवेश करण्याचे निश्चित केले आणि हा प्रवेश करण्यात आला. यावेळी माजी सभापती ॲड. विवेक मांडकुलकर, मोहन सावंत, माजी पंचायत समिती सदस्य मिलिंद नाईक, खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष दीपक नारकर, युवा मोर्चाचे रुपेश कानडे, श्री. वारंग आदी उपस्थित होते. 

माजी उपसरपंच दिलीप निचम, शाखाप्रमुख निलेश खानोलकर यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला यावेळी महायुतीचे उमेदवार निलेश राणे यांनी सांगितले की यापुढे तुमच्यावर कुठच्याही प्रकारचा अन्याय होणार नाही गावाच्या विकासासाठी सदैव मी तुमच्या पाठीशी राहीन आमच्या कुटुंबात तुम्ही आला आहात त्यामुळे तुमची जबाबदारी आम्ही घेतली आहे असे त्यांनी सांगितले.