कुडाळ | प्रतिनिधी
कुडाळ तालुक्यातील निळेली धनगरवाडी येथे धनगर बांधवांच्या धार्मिक कार्यक्रमाला महायुतीचे उमेदवार निलेश राणे यांनी भेट देऊन देवतांचे दर्शन घेतले व धनगर बांधवांना या कार्यक्रमाच्या शुभेच्छा दिल्या.
यावेळी धनगर समाज बांधव सिताराम जानकर दीपक खरात यांनी उमेदवार निलेश राणे यांचे स्वागत केले यावेळी कुडाळ मंडल अध्यक्ष संजय वेंगुर्लेकर, जिल्हा बँक संचालक प्रकाश मोर्ये, मोहन सावंत, भाई बेळणेकर, राजा धुरी, युवा मोर्चाचे रुपेश कानडे, श्रीपाद तवटे तसेच धनगर समाज बांधव उपस्थित होते.
यावेळी निलेश राणे म्हणाले की, आपल्या समाज बांधवांची प्रगती आणि विकास करायचा असेल तर सर्वांनी एकत्र येणे गरजेचे आहे आणि हा विकास करत असताना कोणत्या माध्यमातून आपण करतो याचाही विचार केला पाहिजे आम्ही तुमच्या सोबत आहोत आम्हाला तुमच्या साथीची गरज आहे असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
