भाऊबीज निमित्त महालक्ष्मीची प्रतिमा देऊन पोलीस कर्मचारी ज्योती रायशिरोडकर यांचा सत्कार
कुडाळ | प्रतिनिधी
कुडाळ शहरांमध्ये वाहतूक कोंडी दररो ज डोकेदुखी ठरत आहे मात्र या वाहतूक कोंडीला सुरळीत करण्यासाठी कुडाळ पोस्ट ऑफिस नाका येथे महिला पोलीस वाहतूक नियंत्रक ज्योती रायशिरोडकर या मेहनत घेत असतात आणि त्यांच्या या मेहनतीला सलाम म्हणून रिक्षा संघटनेच्यावतीने भाऊबीज निमित्त रिक्षाव्यवसायिकांनी त्यांचा कुडाळ पोलीस ठाणे येथे सत्कार केला.
कुडाळ शहरातील पोस्ट ऑफिस ते एसटी बस स्थानक डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा या परिसरात मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी होत असते पोस्ट ऑफिस येथे मालवणच्या दिशेने जाणाऱ्या वाहनांना नियंत्रित करणे कठीण काम असते आणि हे काम महिला पोलीस ज्योती रायशिरोडकर या करत असतात त्यांच्या या कर्तव्याला सलाम म्हणून पोस्ट ऑफिस येथे असलेल्या रिक्षा व्यवसायिकांनी त्यांचा सत्कार करून सन्मान केला. यावेळी पोलीस निरीक्षक राजेंद्र मगदूम, सहाय्यक पोलीस निरीक्षक शेखर लव्हे, रिक्षा व्यावसायिक बाळू कुंभार, गणपत सावंत, नारायण घाटकर, चंदू वालावलकर आदी उपस्थित होते.
