विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर १७१ जणांचे प्रतिबंधात्मक कारवाईसाठी प्रस्ताव सादर 

0

हद्दपारीसाठी ७ जणांचे प्रस्ताव

तर

५० जणांचे घेतले बंद पत्र

कुडाळ | प्रतिनिधी 

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यासाठी कुडाळ पोलीस ठाण्याच्या क्षेत्रातील १७१ जणांचे प्रस्ताव प्रांताधिकारी ऐश्वर्या काळुसे यांच्याजवळ करण्यात आले आहेत. त्यामध्ये ७ जणांवर हद्दपारीचा प्रस्ताव तर ५० जणांचे बंद पत्र घेण्यात आले आहे. 

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बीएनएनएस अंतर्गत १२६, १२९, १२८, १६८ नुसार कुडाळ पोलिसांनी प्रस्ताव सादर केले आहे. यामध्ये १२६ नुसार ६० जण, १५९ नुसार २५ जण, १२८ नुसार १५ जण, १६८ नुसार ५० जण तसेच महाराष्ट्र पोलीस अधिनियम ५६ नुसार हद्दपरीचा प्रस्ताव ७ जणांवर, मुंबई पोलीस अधिनियम ९३ दारूबंदी नुसार १५ जणांवर प्रतिबंधात्मक कारवाईचे प्रस्ताव प्रांताधिकारी ऐश्वर्या काळुसे यांच्याजवळ पाठवण्यात आले आहे. मात्र या प्रस्तावांवर अद्याप कार्यवाही झालेली नाही दरम्यान ५० जणांचे बंद पत्र घेण्यात आले आहे.