पिंगुळी नवीवाडी येथील विवाहिता पाच वर्षीय मुलीसह झाली बेपत्ता

0

कुडाळ | प्रतिनिधी 

पिंगुळी नवीवाडी येथील ३४ वर्षीय वर्षा मनोज गावडे ही विवाहिता आपल्या ५ वर्षीय मनश्री या मुलीसह बेपत्ता झाली आहे. याबाबत तिचे पती मनोज गावडे यांनी कुडाळ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. 

पिंगुळी नवीवाडी येथील मनोज गावडे यांनी त्यांची पत्नी वर्षा गावडे व पाच वर्षीय मुली मनश्री हिला नवीवाडी येथून पिंगुळी म्हापसेकर तिठा येथे काल ६ नोव्हेंबर रोजी संध्याकाळी सोडले होते. त्यांची पत्नी वर्षा हिने सांगितले की, मला ब्युटी पार्लरला जाऊन मुलीचा ड्रेस आणायचा आहे. पती मनोज गावडे यांनी आपल्या पत्नीला व मुलीला म्हापसेकर तिठा येथे सोडले. काही वेळानंतर पत्नीला फोन लावला असता तिने उत्तर दिले नाही. त्यामुळे ज्या पार्लरमध्ये ती गेली होती तिथे चौकशी केली असता पार्लरमधून ती निघाल्याचे सांगण्यात आले. पुन्हा फोन लावला असता उत्तर दिले नाही. नंतर शोधाशोध केली असता ती सापडून आली नाही अखेर मनोज गावडे यांनी कुडाळ पोलीस ठाणे येथे आपली पत्नी व मुलगी बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केले आहे.