देवगड | प्रतिनिधी
उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी निवडणुकीच्या जाहीरनाम्यात पंचसूत्री जाहीर केली असून त्यामध्ये महाविकास आघाडी कडूनही महिला भगिनींना दर महिना ३ हजार रुपये मिळणार आहेत. जाहीरनाम्यातील या पंचसूत्रीमुळे कणकवली मतदारसंघातील तिन्ही तालुक्यातून महिला भगिनी व इतर मतदारांकडून चांगला प्रतिसाद महाविकास आघाडीला मिळत आहे. संदेश पारकर हे मोठ्या मताधिकाने विजयी होतील हा मला विश्वास आहे.विद्यमान नितेश राणेंनी दहा वर्षात काय केलं ? हा प्रश्न येथील जनतेला व आम्हाला देखील पडला आहे. देवगडचा नळ पाणी प्रश्नाचे राजकारण का केलं गेलं. आमदार म्हणून देवगडचा पाणी प्रश्न इतके वर्ष का सोडवू शकला नाही हा प्रश्न सारखा उपस्थित होतोय .अशा आमदाराला घरी बसविणे हा आमचा या निवडणुकीतील प्रमुख निकष आहे. यासाठी आम्ही सर्व महाविकास आघाडीचे पदाधिकारी सज्ज झालेले आहोत. आम्ही जनतेत शाश्वत काम घेऊन जाणार आहोत त्यामुळे महाविकास आघाडी सत्तेत येणार व उद्धव ठाकरे मुख्यमंत्री पदावर बसणार ! मुख्यमंत्री पदावर उध्दव ठाकरे बसल्यानंतर पहिला प्रश्न म्हणून देवगडचा पाणी प्रश्न आम्ही सोडवणार असे आश्वासन युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांनी यावेळी दिले.
महाविकास आघाडीचे कणकवली विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार संदेश पारकर यांच्या देवगड जामसंडे शहरातील प्रचाराचा शुभारंभ शनिवारी देवगड जामसंडेचे ग्रामदैवत श्री दीर्बादेवी रामेश्वराचे दर्शन घेत आशीर्वाद घेत करण्यात आला.
यावेळी समृद्धी संदेश पारकर,महिला आघाडी नेत्या सौ हर्षा ठाकूर, तालुकाप्रमुख मिलिंद साटम, राष्ट्रीय काँग्रेस तालुकाध्यक्ष उमेश कुलकर्णी, सज्जाउद्दीन सोलकर, नगरसेवक नितीन बांदेकर, विकास कोयंडे, निनाद देशपांडे, दिनेश पारकर,बाळा कणेरकर , आदिसह महाविकास आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
