Saturday, May 9, 2026
Google search engine
Homeआपलं कुडाळकुडाळ येथे पोलीस प्रशासनाकडून झाले संचलन ; पोलीस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल यांची...

कुडाळ येथे पोलीस प्रशासनाकडून झाले संचलन ; पोलीस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल यांची उपस्थिती 

कुडाळ | प्रतिनिधी 

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कुडाळ शहरात गुरूवारी सायंकाळी सिंधुदुर्ग जिल्हा पोलीस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल व अतिरिक्त जिल्हा पोलीस अधीक्षक कृषिकेश रावले यांच्या उपस्थितीत पोलिस प्रशासनाकडून संचलन करण्यात आले.

२० नोव्हेंबर रोजी विधानसभा सार्वत्रिक निवडणूक होत आहे. या पार्श्वभूमीवर सिंधुदुर्ग जिल्ह्यात पोलीस प्रशासन अलर्ट झाले आहे. कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावा, शांतता, सुव्यवस्था राहावी यादृष्टीने जिल्हा पोलिस प्रशासनाकडून खबरदारी घेण्यात येत आहे. याच अनुषंगाने गुरूवारी सायंकाळी कुडाळ शहरात पोलिस प्रशासनाच्या वतीने संचलन करण्यात आले. यात जिल्हा पोलिस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल, अतिरिक्त जिल्हा पोलीस अधीक्षक कृषिकेश रावले यांच्या नेतृत्वाखाली पोलिस निरीक्षक राजेंद्र मगदूम, सहाय्यक पोलीस निरीक्षक, उपनिरीक्षक, पोलिस अधिकारी, कर्मचारी तसेच सशस्त्र पोलीस दल सहभागी झाले होते. पोलिस स्टेशन येथून या रूट मार्च ला सुरूवात करण्यात आली. जिजामाता चौक, गांधीचौक, बाजारपेठ मार्गे परत पोलीस स्टेशन असा हा रूट मार्च काढण्यात आला.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!