देवेंद्र फडणवीस यांनी एकही नेता घडवला नाही ; सुषमा अंधारे

0

कुडाळ | प्रतिनिधी

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एकही नेता घडवला नाही तर इतर पक्षातून नेते चोरण्याचे काम त्यांनी केले अशी टीका उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी करून खासदार नारायण राणे यांच्यावरही टीकास्त्र सोडले.

उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे महाविकास आघाडीचे उमेदवार वैभव नाईक यांच्या प्रचारार्थ कुडाळ येथे शिवसेनेच्या नेत्या सुषमा अंधारे यांची जाहीर सभा झाली यावेळी आमदार वैभव नाईक यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी व महाविकास आघाडी पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी शिवसेनेच्या नेत्या सुषमा अंधारे म्हणाल्या की, हिंदुरुदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेनेच्या माध्यमातून अनेक नेते घडविले पण देवेंद्र फडणवीस यांनी एकही नेता घडवला नाही त्यांनी इतर पक्षांमध्ये घडलेले नेते चोरी करून घेऊन गेले. असा आरोप करून खासदार नारायण राणे यांना हिंदुरुदय सम्राट बाळासाहेब ठाकरे जिवंत असताना त्यांनी राणे यांची हकालपट्टी केली होती आता खासदार नारायण राणे यांचा एक मुलगा भाजप पक्षातून दुसरा मुलगा शिंदे गटाच्या शिवसेनेतून निवडणूक लढवत आहे असे सांगून त्यांनी व्हिडिओ दाखविले. तसेच त्यांनी मुख्यमंत्री असताना उद्धव ठाकरे यांनी कोरोना काळात केलेल्या कामा बाबत केंद्र व इतर देशांनी केलेल्या कौतुकाबाबत सांगितले. आता तुम्ही ठरवायचं आहे कुणाला निवडून द्यायचं ते असेही त्यांनी या जाहीर सभेत सांगितले.