कुडाळ, 22
कुडाळच्या डीपी प्लॅन बाबत शहरात गोंधळाचे वातावरण.निर्माण झाले असून शहरातील नागरीक चलबिचल झाले आहेत नेमकं काय करावे.. या द्विधा मनस्थितीत नागरिक आहेत..
अशा स्थितीतकुडाळ शहराच्या प्रारूप विकास आराखड्याबाबत (डीपी प्लॅन) काही संभ्रम असल्यास नगरपंचायत कार्यालयाशी संपर्कसाधण्यात यावा असे आवाहन नगराध्यक्षा प्राजक्ता बांदेकर शिरवलकरयांनी केले आहे.
नगराध्यक्ष प्राजक्ता बांदेकर-शिरवलकर यांनी नागरिकांना आवाहन करताना सांगितले की, आपण याबाबत प्रभागात बॅनर लावून नागरिकांमध्ये जनजागृती करत आहोत या विकास आराखड्याबाबत नागरिकांकडून
8 जुलै 2026 पर्यंत हरकती व सूचना मागवण्यात येत आहेत. मुख्याधिकारी यांच्यामार्फत हरकती व सूचना सादर करण्यासाठी आवाहनकेले आहे तसेच हा आराखडा नागरिकांच्या पाहणीसाठी नगरपंचायत कार्यालयात उपलब्ध करून देण्यात आलेला आहे त्यासोबत आरक्षण आरक्षण क्रमांक आरक्षणाचे क्षेत्र सर्वे क्रमांक याबाबत माहिती सुद्धा लावण्यात आली आहे नागरिकांना विकास आराखड्याशी संबंधित माहिती नकाशे तसेच आवश्यक बाबी बाबत कार्यालयीन वेळेत नगर रचना विभागाचे रचना सहाय्यक यांच्यामार्फत मार्गदर्शन करण्यात येत आहे याबाबत काही शंका अथवा माहितीसाठी थेट कुडाळ नगरपंचायत कार्यालयाशी अथवा सहाय्यक संचालक नगर रचना व मूल्य निर्धारण विभाग सिंधुदुर्ग शाखा यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन नगराध्यक्ष यांनी केले आहे.


